For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आईला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

06:08 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
आईला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
Advertisement

चिपळूण: खांदाटपाली येथील हृदयद्रावक घटना

Advertisement

प्रतिनिधी

चिपळूण

Advertisement

आईला विजेच्या धक्क्यातून वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या मुलाचा स्वत:च विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास खांदाटपाली-भुवडवाडी येथे घडली. अक्षय चंद्रकांत मेंगे (31) असे मृत तऊणाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास अक्षय याची आई चंद्रकला मेंगे या पडवीत वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पडवीतील लोखंडी तारेमध्ये वीजप्रवाह उतरल्याने तिला जोरदार विजेचा धक्का बसला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर तिला वाचवण्यासाठी अक्षय तातडीने धावत पडवीत गेला. आई जमिनीवर पडलेली पाहून तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच अक्षयलाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे तोही मोठ्याने ओरडत जमिनीवर कोसळला. त्याचा आवाज ऐकून शेजारी संजय भुवड घटनास्थळी धावले. त्यावेळी अक्षयचा श्वास सुरू असल्याचे दिसून आल्याने त्याला तातडीने खासगी ऊग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

अक्षय हा अविवाहित होता. लहान-मोठी बांधकामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी रात्री अक्षयवर गावच्या स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्याच्या पश्चात आई, वडील, मामा आणि बहिणी असा परिवार आहे.

Advertisement
Tags :

.