महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुलाकडून जन्मदात्याचा खून

12:33 PM Nov 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कृत्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या : तिस्क-उसगांव येथील घटना 

Advertisement

वार्ताहर/उसगांव

Advertisement

अवंतीनगर, तिस्क-उसगांव येथे पोटच्या मुलांने आपल्या वडिलाचा निर्घृण खून करून स्वत:राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवून घेतल्याचा दुर्दैवी प्रकार काल बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आला. पिता बळीराम दत्तोबा चंदगडकर ( 65, मूळ चंदगड कर्नाटक) व मुलगा प्रमोद बळीराम चंदगडकर (40) अशी मृत पिता-पुत्राची नावे आहेत. मुलाने ही टोकाची भूमिका घेण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाने धारदार शस्त्राने आपल्या वडिलाचा खून केला व त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. वडिलाने काबाडकष्ट करून घर उभारले होते. त्यात हे दोघेच राहत होते.

वडिलाने तिस्क भागात हमाली करून हे घर उभे केले होते. सध्या वडील वयस्क असल्याने घरीच असायचे तर मुलगा रोजंदारी करून दोघेही आनंदात जीवन व्यतित करीत होते. या घटनेमुळे शेजाऱ्यांनाही धक्का बसला आहे. बळीराम यांची पत्नी कोरोनाकाळात मरण पावली होती. त्यांचा अन्य एक मुलगा काही वर्षापूर्वी वारला होता. तसेच विवाहित मुलीचाही तिस्क येथे निर्घृण खून झाला होता. सध्या चंदगडकर कुटूंबियाचे कोणीच नसून केवळ विधवा मुलगी आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल करण्यात आली. मुलाने पित्याचा खून करण्यासाठी वापरलेले  हत्यार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article