कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Crime News: आईचा निर्घृण खून करुन, मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, रत्नागिरीतील धक्कादायक घटना

04:09 PM Aug 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आईचा खून केल्यानंतर संशयित मुलाने स्वत:च्या मनगटावर चाकूने वार केले

Advertisement

रत्नागिरी : शहरालगतच्या नाचणे-शांतीनगर येथे मुलाने गाढ झोपेत असलेल्या आईचा गळा चिरून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. पूजा शशिकांत तेली (50, ऱा नाचणे, शांतीनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. आईचा खून केल्यानंतर संशयित मुलाने स्वत:च्या मनगटावर चाकूने वार केले.

Advertisement

तसेच विषारी द्रव प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. घरगुती वादातून आईचा खून केल्याची माहिती समोर येत असून पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत शशिकांत तेली (25) असे संशयिताचे नाव आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करताना गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी खूनाची घटना समोर येताच शहर परिसरात खळबळ उडाली. संशयित आरोपी हा बेशुद्ध अवस्थेत असल्याने खूनाचे नेमके कारण अद्याप समोर येवू शकले नाही. प्राथमिक तपासात घरगुती वाद असल्याचे समोर आले असले तरी पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येत आहे.

झोपेत असलेल्या आईचा गळा चिरुन केला खून

संशयित आरोपी अनिकेत हा त्याची आई व आजी यांच्यासोबत वास्तव्य करत होता. तर त्याची चुलती ही शेजारी रहावयास असते. 25 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 वाजता अनिकेत हा रात्रीचे जेवण करुन आईसोबत घराच्या वरच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता.

रात्रीच्या सुमारास आई गाढ झोपली असल्याचे हेरुन अनिकेत याने त्यांना संपविण्याचा मनसुबा रचला. आई निद्रीस्त झाल्याची खात्री होताच त्याने स्वयंपाक घरातील धारदार चाकू आणत त्या चाकूने क्षणाधार्थ आई पूजा यांचा गळा चिरून खून केला. पूजा यांचा गळा चिरताच रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा तडफडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्वत:च्या दोन्ही हाताच्या नसा कापण्याचा प्रयत्न

आईचा खून केल्यानंतर अनिकेतने स्वत:लाही संपवण्याचा इरादा केला. आईचा खून केलेल्या चाकूनेच स्वत:च्या दोन्ही हाताच्या मनगटावर सपासप वार करून नसा कापण्याचा प्रयत्न केला. अनिकेतने स्वत:ला संपविण्यासाठी केवळ नसाच कापण्याचा प्रयत्न केला नव्हता तर विषारी द्रवही प्राशन केल्याचे समोर येत आहे.

स्वत:चा मृत्यू समोर दिसताच चुलतीचे दार ठोठावले

अनिकेत याच्या शेजारीच त्याच्या चुलत्यांचे घर आहे. स्वत:च्या कापून घेतलेल्या नसा व प्राशन केलेले विषारी द्रव यामुळे अनिकेत व्याकूळ झाला होत़ा आपण आता मरणार, याची त्याला भीती वाटू लागली. त्याच भेदरलेल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेत शेजारीच राहणाऱ्या चुलत्यांच्या घराकडे त्याने धाव घेतली.

पहाटे 4.45 वाजण्याच्या सुमारास त्याने चुलती आरती तेली यांचे दार ठोठावले. एवढ्या पहाटे दार कुणी ठोठावले, हे पाहण्यासाठी आरती यांनी दार उघडले. समोरच अनिकेत हा रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसला हे पाहताच आरती यांचाही थरकाप उडाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आईचा खून केल्याचे सांगताच चुलतीची बोबडी वळाली

अनिकेतला रक्ताळलेल्या अवस्थेत पाहून आरती यांनी त्याच्याकडे विचारपूस केली. तर त्याने आईचा खून केला असून ती बेडऊममध्ये पडल्याचे सांगितले. हे ऐकताच आरती यांच्या पायाखालची वाळू सरकली. एकाएकी त्यांची बोबडी वळली. आरती यांना नेमके काय बोलावे, हे सुचेनासे झाले. स्वत:ला कसे-बसे सावरत मोठ्या धिटाईने अनिकेतसोबत त्या घरामध्ये गेल्या. घरातील बेडरुममध्ये जावून पाहिले तर बेडवर पूजा या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.

पोलिसांत दिली खूनाची खबर

घडल्या भयावह प्रकाराची आरती आणि अनिकेतची आजी यांनी शहर पोलिसांत माहिती दिली. पोलीसही घटनेची खबर मिळताच तत्काळ अनिकेत याच्या घरी दाखल झाले. त्यांनी घडल्या प्रकाराची खातरजमा केली. जखमी अवस्थेत असलेल्या अनिकेतला लागोलाग उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

पोलीस अधिकाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी

मुलाने आईचा खून केल्याचे समजताच पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईंनकर आदी घटनास्थळी दाखल झाले. तसेच श्वानपथक, फॉरेन्सिक लॅबचे पथक आदींनी घटनास्थळाचा ताबा घेतला. पोलिसांकडून पंचनामा करुन पूजा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा ऊग्णालय येथे पाठवला.

अनिकेतवर खूनाचा गुन्हा दाखल

घडलेल्या घटनेबाबत अनिकेत याची चुलती आरती चंद्रकांत तेली यांनी रत्नागिरी शहर पोलिसात खबर दिली. पोलिसांनी या प्रकरणी अनिकेतविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. अनिकेत याच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. त्याने खून करण्याचे कारण अद्याप उघड होवू शकलेले नाही. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.

तीन महिन्यांपूर्वी अनिकेतच्या वडिलांनी केली होती आत्महत्या

संशयित आरोपी अनिकेत यांचे वडील व मृत पूजा यांचे पती शशिकांत तेली यांनी 26 मे 2025 रोजी विषारी द्रव प्राशन कऊन आत्महत्या केली होती. आर्थिक कारणातून त्यांनी ही आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. कुटुंबात असलेल्या कलहाचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

ऐन गणेशोत्सवात खूनाच्या घटनेने खळबळ

कोकणातील मोठा सण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाला बुधवारपासून सुरुवात होत आहे. सर्वजण गणेशोत्सवाच्या तयारीत मग्न असताना आईने मुलाचा खून केल्याची घटना समोर आली. मंगळवारी सकाळी शहर व लगतच्या परिसरात खूनाच्या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.

Advertisement
Tags :
@ratnagiri#crime news#Ganesh Chaturthi#Police action#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article