For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काही राज्यांनी केवळ 55 टक्केच निधी केला खर्च

06:08 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
काही राज्यांनी केवळ 55 टक्केच निधी केला खर्च
Advertisement

11 महिन्यांमधील 22 राज्यांनी केलेल्या खर्चाचा समावेश: महालेखापरीक्षकांच्या मासिक हिशोब विश्लेषणामधून माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील 22 राज्यांनी एकत्रितपणे 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी) अर्थसंकल्पात वाटप केलेल्या त्यांच्या वार्षिक भांडवली खर्चापैकी 55.27 टक्के खर्च केला असल्याची माहिती आहे. दरम्यान  भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (सीएजी) जारी केलेल्या मासिक हिशेबांच्या विश्लेषणानुसार हा आकडा समोर आला आहे.

Advertisement

यामध्ये 22 राज्यांनी 5.65 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला, तर या बाबीअंतर्गत एकूण रक्कम 10.22 लाख कोटी रुपये होती.

सध्या 22 राज्यांच्या भांडवली खर्चाची आकडेवारी उपलब्ध आहे. यापैकी 9 राज्यांनी एप्रिल-फेब्रुवारी कालावधीत अर्थसंकल्पीय अंदाजातील भांडवली खर्चाच्या निम्म्याहून कमी खर्च केला. यामध्ये राजस्थान (44.32 टक्के), महाराष्ट्र (48.16 टक्के), उत्तराखंड (49.71 टक्के) आणि उत्तर प्रदेश (42.45 टक्के) यांचा समावेश आहे.

या काळात राज्ये आणि केंद्र यांच्या भांडवली खर्चात विसंगती दिसून आली. या काळात राज्यांनी संथ गतीने भांडवली खर्च केला. महालेखा नियंत्रकांच्या ताज्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल ते फेब्रुवारी) केंद्र सरकारचा भांडवली खर्च सुधारित अंदाजाच्या 84.8 टक्क्यांवर पोहोचला.

या आकडेवारीच्या तुलनेवरून असे दिसून येते की, या 25 राज्यांनी मागील आर्थिक वर्षात भांडवली खर्चावर खूप जास्त खर्च केला. या राज्यांनी एकत्रितपणे आर्थिक वर्ष 2025 मध्ये त्यांच्या अर्थसंकल्पीय भांडवली खर्चापैकी 80.2 टक्के खर्च केला. या क्रमाने या राज्यांनी 9.7 लाख कोटी रुपयांच्या एकूण वाटपापैकी 7.8 लाख कोटी रुपये खर्च केले.

दुसरीकडे, महसुली खर्चात अधिक स्थिरपणे वाढ झाली. एप्रिल-फेब्रुवारी दरम्यान, 22 राज्यांनी त्यांच्या 49.3 लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय महसुली खर्चापैकी 75.5 टक्के खर्च केला. हिमाचल प्रदेशने 91.8 टक्क्यांसह सर्वाधिक वापर नोंदवला. त्यानंतर बिहार (89.6 टक्के), पंजाब (84.7 टक्के) आणि आंध्र प्रदेश (83.75 टक्के) यांचा क्रमांक होता. झारखंड (64.71 टक्के), महाराष्ट्र (63.6 टक्के) आणि अरुणाचल प्रदेश (60.44 टक्के) हे सर्वात कमी खर्च करणाऱ्या राज्यांपैकी होते.

आफ्रिकेतही मजबूत व्यवसाय

भांडवली खर्चात खालील राज्ये अव्वल

भांडवली खर्चात हरियाणा अव्वल स्थानी हरियाणाने 94.15 टक्के भांडवली खर्च साध्य केला. त्यापाठोपाठ हिमाचल प्रदेश (90.99 टक्के), बिहार (84.78 टक्के) आणि मध्य प्रदेश (74.35 टक्के) यांचा क्रमांक होता.  दुसरीकडे, पाच राज्यांनी विशेषत:  संथ प्रगती नोंदवली आणि त्यांच्या वार्षिक वाटपाच्या 40 टक्क्यांपेक्षा कमी खर्च केला.या कालावधीत पश्चिम बंगालने अर्थसंकल्पात वाटप केलेल्या भांडवली खर्चापैकी 33.61 टक्के खर्च केला, तर मेघालयाने 34.15 टक्के खर्च केला.

Advertisement
Tags :

.