For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : स्ट्रीट लाईट सिस्टीम अपग्रेडेशनमुळे काही दिवे दिवसा सुरू राहणार

01:40 PM Oct 19, 2025 IST | NEETA POTDAR
sangli   स्ट्रीट लाईट सिस्टीम अपग्रेडेशनमुळे काही दिवे दिवसा सुरू राहणार
Advertisement

Advertisement

           सांगलीत स्मार्ट स्ट्रीट लाईटचं आधुनिकीकरण सुरू

सांगली: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात सध्या स्ट्रीट लाईट व्यवस्थापनाचे महत्त्वाचे तांत्रिक कामकाज सुरू आहे. सांगली समुद्र स्ट्रीट लायटिंग प्रा. लि. या कंपनीमार्फत शहरातील संपूर्ण स्ट्रीट लाईट प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.

Advertisement

या कामांतर्गत, स्ट्रीट लाईट सुरू व बंद करण्यासाठी असलेले सीसीएसएस पॅनल आणि सर्व स्मार्ट एल.ई.डी. दिवे कंपनीच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदविण्याचे कामकाज सुरू आहे. सदर तांत्रिक कामाची तपासणी आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील काही भागांतील स्ट्रीट लाईट काही दिवस दिवसा सुरू राहतील.

नागरिकांनी सदर तांत्रिक बाबीची नोंद घेऊन महानगरपालिका प्रशासनास आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता विद्युत. अमर चव्हाण यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.