For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काही देशांच्या विमानसेवांना प्रारंभ

06:34 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
काही देशांच्या विमानसेवांना प्रारंभ
Advertisement

वृत्तसंस्था / कुवेत

Advertisement

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष पेटलेला असताना आखातातील काही देशांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय विमानसेवांचा पुन्हा प्रारंभ केला आहे. दुबई आणि अबुधाबी यांनी त्यांच्या विमानसेवा पुन्हा पूर्ववत करण्यास प्रारंभ केला असून त्यामुळे हे युद्ध लवकर थांबूही शकते असे संकेत मिळत आहेत. तथापि, अद्याप या संदर्भात कोणतीही निश्चितता नाही, असेही पहावयास मिळत आहे.

गेले तीन दिवस या देशांमधील विमानसेवा आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्णत: बंद होत्या. भारतातून या देशांना जाणारी विमानेही बंद ठेवण्यात आली होती. तथापि, सोमवारी दुपारनंतर हल्ले आणि प्रतिहल्ले यांचे प्रमाण कमी झाले. रविवारी आणि सोमवार यांच्या मधल्या रात्री अमेरिकेने इराणवर कोणताही हल्ला केलेला नाही, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

सोमवारचे बहुतेक सर्व हल्ले इस्रायलनेच केलेले आहेत. तथापि, इराणने मात्र, काही आखाती देशांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स डागले. त्यामुळे नंतर इस्रायलनेही इराणच्या आणखी काही भागांना लक्ष केले, असे दिसून आले. हे युद्ध किमान 15 दिवस चालेल, असे अनुमान काही तज्ञ आजही व्यक्त करीत आहेत. तथापि, ते येत्या एक-दोन दिवसांमध्ये संपूही शकते. ते संपल्यानंतर स्थैर्य येण्याची शक्यता असून तेलाचे दरही स्थिरस्थावर होतील आणि तेलाचा पुरवठाही पूर्ववत होईल, अशी आशा आता निर्माण झाली आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी पाच वाजल्यापासून मध्यपूर्वेत बरीचशी शांतता आहे. मात्र, चर्चेला लवकर प्रारंभ न झाल्यास परिस्थिती पुन्हा चिघळू शकते, असेही बोलले जात आहे. अमेरिकेने आपले मध्यपूर्वेतील तळ आता अधिक सुरक्षित करण्यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती देण्यात आली असून येत्या दोन दिवसांमध्ये मध्यपूर्वेतील विमानसेवा सुरळीत होणे शक्य आहे.

Advertisement
Tags :

.