केवळ महिलांना दिसतात काही रंग
जगात काही अशा महिला आहेत, ज्या 10 कोटी रंग पाहू शकतात, तर सर्वसामान्य माणूस केवळ 10 लाख रंगच पाहू शकतो. ही काही जादू नव्हे तर विज्ञानाची एक दुर्लभ प्रक्रिया असून याला टेट्राकोमेसी म्हटले जाते, काही महिला पुरुषांना अजिबात न दिसणारे रंग पाहू शकतात.
सामान्य माणूस किती रंग पाहतो?
आमच्या डोळ्यांमध्ये तीन प्रकारचे कनो सेल्स असतात, जे रंग ओळखतात...
-लाल
-हिरवा
-निळा
या तिन्हींच्या मिश्रणातूनच आम्ही जवळपास 10 लाख रंग पाहू शकतो, याला ट्रायक्रोमेसी म्हटले जाते. बहुतांश लोक (पुरुष आणि महिला) टायक्रोमॅट असतात.
टेट्राक्रोमेसी म्हणजे काय?
काही दुर्लभ प्रकरणांमध्ये खासकरून महिलांमध्ये डोळ्यांमध्ये चार-चार कोन सेल्स असतात. चौथा कोन सेल वेगवेगळ्या वेवलेंथला (रंगाचे तरंग) पकडतो, ज्यामुळे तो 1 कोटीपर्यंत रंग पाहू शकतो. म्हणजेच ते रंगांच्या अत्यंत सुक्ष्म शेड्स (उदाहरणार्थ फिकट गुलाबी आणि दाट गुलाबीदरम्यान शेकडो अंतर) सहजपणे वेगळा करू शकतात, जे सामान्य लोकांना एकसमान वाटतात. हा काही एक खास नवा रंग नाही, तर रंगांची संख्या आणि दाटपणा अत्यंत अधिक असतो. उदाहरणार्थ जेव्हा आपण हिरव्या रंगात 100 शेड्स पाहतो, तेव्हा ते 10 हजार शेड्स पाहू शकतात.
महिलांमध्येच अधिक का?
-हे जेनेटिक्समुळे आहे, लाल आणि हिरव्य रंगाचे कोन सेल्सच्या जीन एक्स क्रोमोजोमवर असतात.
-महिलांकडे दोन एक्स क्रोमोजोम असतात.
-जर एका एक्समध्ये सामान्य जीन आणि दुसऱ्यामध्ये काहीसा वेगळा जीन असेल तर चौथ कोन सेल तयार होऊ शकतो.
-पुरुषांकडे केवळ एक एक्स क्रोमोजोम असतो (एक्सवाय), यामुळे त्यांच्यासाठी हे जवळपास अशक्य आहे.
जगातील 2-3 टक्के महिलांमध्ये टेट्राक्रोमेसीची जेनेटिक शक्यता असते, परंतु प्रत्यक्षात याचा वापर करणाऱ्या अत्यंत कमी आहेत असा वैज्ञानिकांचा अनुमान आहे.
पक्ष्यांशी जोडलेले आहे रहस्य
टेट्राक्रोमेसीचा विकास पक्ष्यांशी जोडलेला आहे. अनेक पक्षी (उदाहरणार्थ पोपट, कबूतर) टेट्राक्रोमॅट किंवा पेंटक्रोमॅट असतात, त्यांच्याकडे चौथा कोन सेल अल्ट्रावायलेट लाइट पाहू शकतो, यामुळे ते पिकलेले फळ, फुलांचा रस आणि साथी पक्षी सहजपणे शोधू शकतात. विकासादरम्यान जुन्या सस्तन प्राण्यांमध्ये केवळ दोन कोन सेल्स होते, मग प्रायमेट्समध्ये (माकड अन् माणसांचे पूर्वज) तिसरा कोन सेल विकसित झाला, जेणेकरून झाडांवर लाल-पिवळ पिकलेले फळ हिरव्या पानांमध्ये सहजपणे दिसू शकेल. मानव टेट्राक्रोमेसी त्याच प्राचीन सिस्टीमचे एक व्हेरिएशन आहे, जे कधीकधी परत सक्रीय होत जाते.
काही महिलांमध्ये उपयुक्त
काही महिलांमध्ये हे वैशिष्ट्या पूर्णपणे काम करते. प्रसिद्ध उदाहरण ऑस्ट्रेलियन कलाकार कोंसेटा एटीको आहे. ती इतके सुक्ष्म रंग पाहते की तिच्या चित्रांमध्ये हजारो शेड्स असतात. वैज्ञानिक परीक्षणातही काही महिलांनी आपण अधिक रंग वेगळे करू शकतो हे सिद्ध केले आहे. परंतु प्रत्येक महिलेत हे वैशिष्ट्या नसते. बहुतांशांमध्ये जेनेटिक पोटेंशियल असते, परंतु मेंदू त्याचा वापर करत नाही.
तुम्ही कसे जाणू शकता?
ऑनलाइन काही टेस्ट असुन त्यात रंगांचे अत्यंत सुक्ष्म शेड्स दाखविले जातात, जर तुम्ही सहजपणे त्यातील अंतर सांगितले तर तुमच्याकडे ही क्षमता असू शकते. परंतु योग्य परीक्षणासाठी लॅबमध्ये विशेष तपासणी आवश्यक आहे. टेट्राक्रोमेसी निसर्गाची एक सुंदर भेट असून ती काही महिलांना रंगांचे नवे जग दाखविते. आमचे डोळे किती मर्यादित आहेत याची आठवण हे आम्हाला करून देते. निसर्गात किती रहस्यं दडलेली आहेत हे यातून स्पष्ट होते.