सोमाभाई दामोदरदास मोदी आज गोव्यात
बीबीएल मराठी न्यूज चॅनेलचा पुरस्कार वितरण सोहळा : कार्यक्रम दोन सत्रांमध्ये पार पडणार
पणजी : प्रिंट, सोशल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम क्षेत्रातील नामांकित भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क संचलित बीबीएल मराठी न्यूज चॅनेलच्या 14व्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारे राष्ट्रीय स्तरावरील ‘इन्स्पायर आयडॉल-प्रेरणामूर्ती पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. हा भव्य पुरस्कार सोहळा शनिवार, दि. 31 जानेवारी रोजी पणजी येथील कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती बीबीएल मराठीचे सीईओ तथा महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष पत्रकार राजीव लोहार यांनी दिली.
सकाळी 10.30 ते दु. 1.30 या वेळेत संपन्न होणाऱ्या या समारंभाचे अध्यक्षस्थान सोमाभाई दामोदरदास मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधु, अहमदाबाद, गुजरात) भूषवणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून दै. तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर, महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार अमित गोरखे, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, दै. तरुण भारत गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर, प्रा डॉ. नवनीत मंदानी, दशरथ परब, तानाजी मोहिते, अमोल सुतार, प्रिया काळे, अॅड. अजितसिंह राणे व अर्चना माली उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यांतील सहकार, कृषी, शिक्षण, वैद्यकीय, पत्रकारिता, उद्योग, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तिमत्त्वांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये आमदार अमित गोरखे, डॉ. नवनीत मंदानी, प्रमोद कमलाकर, दशरथ परब, तानाजी मोहिते, अमोल सुतार, प्रिया काळे नगरकर, अॅड. अजितसिंह राणे सरदेसाई, नीलेश वेर्णेकर, सचिन वाघ, विनायक पांचाळ, डॉ. दिगंबर जालिंदर चौरे, सचिन रेडीज, डॉ. राजकुमार अडकर, वैष्णवी डावाळे, उज्वला सातपुते महाजन, शिवलिंग कळंत्रे, डॉ. रितिष्का सुतार, देवराज हजारे, डॉ. सचिन पवार, ह.भ.प. कृष्णा फाटे, डॉ. पल्लवी चिंधे, डॉ. उमेश झेंडे, डॉ. जयप्रकाश घुमटकर, सोमनाथ नागरी सह. पतसंस्था, डॉ. श्रेया खंडागळे, संग्रामसिंह साळुंखे, डॉ. सायली डोंगरे, कन्नम माळी, विनायक राठोड, उत्तम मगदूम, डॉ. गणेश पाडवी, डॉ. धनंजय भोसले, प्रकाश नागठाणे, साहिल कुंभार, रवींद्र पाटील, पल्लवी कोरे, संजय सावंत आदी मान्यवरांचा नामांकनामध्ये समावेश करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप पुणेरी पगडी, महावस्त्र, गोल्डन सन्मानचिन्ह व मानपत्र असे असणार आहे. कार्यक्रम दोन सत्रांमध्ये पार पडणार असून, पहिल्या सत्रात स. 10 वा. सांस्कृतिक कार्यक्रम, तर दुसऱ्या सत्रात स. 11 वा. मुख्य पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व पुरस्कार प्रदान यांसह हा सोहळा संपन्न होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका अॅड. प्राजक्ता लोहार करणार आहेत. बीबीएल मराठीच्या माध्यमातून समाजातील प्रेरणादायी कार्यकर्तृत्वाला सन्मान देण्याचा हा उपक्रम असून, या सोहळ्यामुळे विविध क्षेत्रांतील कार्यरत व्यक्तींना नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.