For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच हुतात्मादिनी खरी श्रद्धांजली

07:42 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच हुतात्मादिनी खरी श्रद्धांजली
Advertisement

कंग्राळी खुर्द येथे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित हुतात्म्यांना अभिवादन-श्रद्धांजली कार्यक्रमात मांडले विचार

Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

सीमाप्रश्नाची सोडवणूक तसेच मराठी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी गेली 68 वर्षे सुरू असलेल्या सीमा आंदोलनात अनेक हुतात्म्ये झाले. 16 जानेवारी 1956 साली भाषांवार प्रांतरचना करण्यात आली आणि मुंबईशी सलग्न असलेला मराठी बहुभाषिक परिसर बेळगावसह 865 खेडी कर्नाटकामध्ये डांबण्यात आली. यामुळे सीमाभागात एकच उद्रेक झाला. त्यावेळी पोलिसानी केलेल्या गोळीबारात कंग्राळी खुर्द गावचे पै. मारूती बेन्नाळकर हुतात्मा झाले तर बाळू निलजकर हिंडलगा जेलमध्ये हुतात्मा झाले. सीमाप्रश्नाची सोडवणूक व मराठी भाषा टिकविणे हीच आजच्या हुतात्मादिनी सर्व हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे अभिवादनपर विचार मांडण्यात आले. बुधवारी 17 जानेवारी रोजी कंग्राळी खुर्द येथे म. ए. समितीतर्फे हुतात्म्यांना अभिवादन व श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. यावेळी वरील विचार मांडले. हुतात्म्ये अमर रहे, बेळगाव, खानापूर, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा यावेळी दिल्या.

Advertisement

प्रारंभी हुतात्मा बाळू निलजकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आम. मनोहर किणेकर, आर. आय. पाटील, बी. डी. मोहनगेकर, माजी ता. पं. अध्यक्षा अर्चना अंलगोंडी यांच्या हस्ते करून अभिवादन केले. यानंतर गावाच्या वेशीमध्ये उभारलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन समिती नेते आर. एम. चौगुले, ग्रा. पं. माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील व इतरांच्या हस्ते केले. हुतात्मा मारूती बेन्नाळकर यांच्या प्रतिमा फलकाचे पूजन अॅड. सुधीर चव्हाण यांनी केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व ग्रा. पं. कंग्राळी खुर्द नामफलकाचे पूजन जि. पं. च्या माजी सदस्या सरस्वती पाटील, ता. पं. च्या माजी अध्यक्षा अर्चना अलगोंडी यांच्या हस्ते केले. हुतात्मा चौकामध्ये हुतात्मा पै. मारुती बेन्नाळकर, बाळू निलजकर यांच्या फोटोचे पूजन मनोहर किणेकर, शिवाजी सुंठकर, मनोज पावशेसह इतर समिती कार्यकर्त्यांनी केले.

यानंतर महात्मा फुले मंगल कार्यालयामध्ये आयोजिलेल्या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी भाग्योदय महिला सोसायटीच्या अध्यक्षा रुक्मिणी निलजकर होत्या. प्रास्ताविकमध्ये म. ए. समितीचे सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी सीमाप्रश्न व हुतात्म्ये झालेल्यांची आठवण करून दिली. रामचंद्र मोदगेकर, मनोज पावशे, आर. एम. चौगुले, सरस्वती पाटील, रुक्मिणी निलजकर यांनीही यावेळी सीमाप्रश्न व अभिवादन कार्यक्रमात विचार मांडले. यावेळी समिती नेते लक्ष्मण होनगेकर, विलास घाडी, रावजी पाटील, एपीएमसीचे माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, ता. पं. सदस्या मनिषा परिट, शिवसेना बेळगाव जिल्हा अध्यक्ष प्रकाश शिरोळकर, शिवाजी कुट्रे, सुरेश अगसगेकर, विजय सावंत, तम्माना पाटीलसह तालुक्यातील मराठी भाषिक कार्यकर्ते उपस्थित होते.

लक्ष्मी बेन्नाळकर यांना आर्थिक मदतीचा हात

हुतात्मा दिनाचे औचित साधून हुतात्मा मारूती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मी बेन्नाळकर यांना साडीचोळी देऊन त्याना दिलासा देण्यात आला. तसेच त्यांना त्यांच्या आर्थिक खर्चासाठी माजी आम. मनोहर किणेकरांकडून 5000 रु, किणये ग्रामस्थांकडून 10000 रु., आर. एम. चौगुले 5000 रु., वाघवडे ग्रामस्थ 2000 रु., अॅड. सुधीर चव्हाण, विलास देवगेकर प्रत्येकी 1000 रु., वसंत मन्नोळकर, अॅड. सतीश बांदिवडेकर, संतोष मंडलिक, अनिल हेगडे यांच्याकडून प्रत्येकी 500 रु. याप्रमाणे आर्थिक सहकार्य केले.

Advertisement
Tags :

.