महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वाळू तुटवडा समस्येवर तोडगा काढा

10:19 AM Nov 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भटकळमध्ये मोर्चा : गरीब बांधकाम मजुरांचा समावेश अधिक : बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याने गैरसोय

Advertisement

कारवार : अवैज्ञानिकधोरण आणि नियमांमुळे भटकळ तालुक्यात निर्माण झालेल्या वाळू तुटवडा समस्येवर यशस्वी तोडगा काढावा या मागणीसाठी भटकळमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये वाळू समस्येमुळे प्रभावीत झालेले हजारो नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. गरीब बांधकाम मजुरांचा समावेश अधिक दिसून आला. गेल्या पाच सहा महिन्यांपासून भटकळ तालुक्यातील वाळू समस्येने गंभीर स्वरुप धारण केले आहे. वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे तालुक्यातील बांधकाम क्षेत्र गेल्या पाच सहा महिन्यांपासून ठप्प झाले. या समस्येचा फटका बांधकाम मजूर, सिव्हिल इंजिनिअर्स बांधकाम आणि सेंट्रिंग मेस्त्राr, वाहतूकदार, बिल्डर्स, सिमेंट व लोखंड विक्रेत्यांसह इतरांना बसला आहे.

Advertisement

एका अंदाजानुसार बांधकाम ठप्प झाल्याने मजुरांना समोर दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तर सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेली बांधकामे ठप्प झाली आहेत. गेल्या अनेक आठवड्यांपासून या समस्येवर तोडगा काढण्याची ममागणी जिल्हा पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे केली जात आहे. तथापि, कुणाकडूनही मागणीची दखल घेतली जाईना असे झाले आहे. त्यामुळे हजारो नागरिक अॅटो बसस्टॅण्डवर जमा झाले. तेथून शमशुद्दीन सर्कलपर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचवेळी जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

शमशुद्दीन सर्कलपासून मिनी विधानसौधपर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्यावेळी पोलीस आणि आंदोलकांच्या दरम्यान शाब्दीक चकमकी झाल्या. जोपर्यंत पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी ठासून सांगितले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वरील वाहतूक अडविण्याचा प्रयत्न केला. जर जिल्ह्यातून वाळू पुरवठा करणे शक्य नसेल तर शेजारच्या उडपी जिल्ह्यातून वाळू आणण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article