For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रभाग क्र. 10 मधील समस्या तातडीने सोडवा

11:04 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रभाग क्र  10 मधील समस्या तातडीने सोडवा
Advertisement

नगरसेविका भातकांडेंचे आमदार राजू सेठना निवेदन

Advertisement

बेळगाव : शहरातील प्रभाग क्र. 10 मध्ये विविध समस्या भेडसावत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिकेकडे फंड कमी आहे. त्यामुळे या प्रभागाच्या नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी व तेथील तरुणांनी आमदार राजू सेठ यांच्याकडे निवेदन देऊन निधी उपलब्ध करावा अशी मागणी करण्यात आली आहे. प्रभाग क्र. 10 मध्ये पाटील मळा, मुजावर गल्ली, अंबाभुवन रोड, टिळक चौक रोड, शिवाजी रोड यासह इतर परिसर येतो. याठिकाणी ड्रेनेज, गटारी, रस्ते या समस्या भेडसावत आहेत. याचबरोबर वीज वाहिन्या भूमिगत घालाव्यात अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. आमदार फंडातून विशेष निधी मंजूर करावा आणि या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. आमदार राजू सेठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सिद्धार्थ भातकांडे, राहुल हंगिरकर, प्रसाद चराटे, संकेत भडगावे, आदित्य पाटील, निखिलेश पवार, वरुणेश पवार यासह तरुण उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.