महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वीज समस्यांनी हैराण झालेल्या नागरिकांचा प्रश्न सोडवा !

05:11 PM Nov 10, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

राजन तेलींनी वीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांसमोर वाचला तक्रारींचा पाढा

Advertisement

सावंतवाडी |  प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी शहर व तालुक्यातील गावागावात तसेच वेंगुर्ले, दोडामार्ग या सर्व भागात सध्या विजेच्या समस्या अधिक आहेत. या समस्या तात्काळ सोडवा . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहक वीज वितरणला विज बिल भरताना चांगले सहकार्य करतात . मात्र , वीज गायब होणे जुनेच आहे . विजेच्या पोलांवर अपघात होण्याचे प्रमाण वाढलेय . त्यामुळे गावागावात वीज पोल बदलणे ,कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे तो सुरळीत करा अशा अनेक समस्यांचा पाढा आज भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी व त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्यासमोर वाचला . येत्या पंधरा दिवसात या सर्व समस्या सोडवा . पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वीज समस्या याबाबत येत्या पंधरा दिवसानंतर बैठक घेतली जाईल असेही त्यांनी सुनावले. त्या अगोदर ही रंगीत तालीम आहे . हे लक्षात घ्या. दिवाळी सणात वीज कर्मचारी अधिकारी सुट्टीवर असल्याने मला फक्त वीस दिवसाचा अवधी द्या . या वीस दिवसानंतर निश्चितपणे सर्व वीज समस्या सोडवण्याची ग्वाही श्री पाटील यांनी दिली. आज शुक्रवारी सावंतवाडीतील वीज वितरणच्या कार्यालयात विधानसभा मतदारसंघातील वीज समस्या जाणून घेण्यासाठी श्री तेली यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी अधीक्षक अभियंता विनोद पाटील, प्रकाश तानपुरे, सावंतवाडी वीज वितरण चे अधिकारी श्री चव्हाण आधी उपस्थित होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब ,शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे ,दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, माजी उपसभापती शितल राऊळ ,बाळा जाधव खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे ,तुकाराम अमोणेकर ,सरंबळे सरपंच विजय गावडे ,अजित सावंत ,औदुंबर पालव ,उमेश पेडणेकर ,दादा परब, दिलीप भालेकर, गुरु सावंत, ज्ञानेश्वर सावंत ,विनोद सावंत, आदी उपस्थित होते .

Advertisement
Tags :
# tarun bharat news # sawantwadi # rajan teli # bjp #
Next Article