महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मारुतीनगर येथील समस्या तातडीने सोडवा

10:16 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

परिसरातील नागरिकांचे महापालिकेला निवेदन

Advertisement

बेळगाव : बेळगाव-सांबरा रोडवरील एससी मोटरच्या मागील बाजूस असलेल्या मारुतीनगरवासियांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी महानगरपालिकेत जाऊन समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांना निवेदन दिले आहे. येथे गटारी, पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. याचबरोबर ड्रेनेजची समस्याही गंभीर बनली असून तातडीने या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मारुतीनगर वॉर्ड क्रमांक 52 येथे त्याठिकाणी रस्ते तसेच पथदिपांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र गटारी नसल्यामुळे पाण्याचा निचरा होणे अवघड झाले आहे. याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्याही गंभीर बनत चालली आहे. यावर्षी पाण्याची समस्या आणखी गंभीर बनणार असून तातडीने पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. ड्रेनेजची समस्याही गंभीर बनत चालली आहे. ड्रेनेज पाईप काही ठिकाणी नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा ड्रेनेजपाईप घालून तातडीने ही समस्याही सोडवावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी एम. के. हुलबत्ते, मल्लाप्पा गंगण्णावर, शांतीनाथ पाटील, विजय शेरी, संगमेश्वर बंकापूर, चंद्रकांत संभाजीचे, काडाप्पा केंचगौडर, एस. बी. पाटील, जी. एस. हागीदाळ, विजय कुंभार यांच्यासह रहिवासी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article