For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुने गांधीनगर ड्रेनेजची समस्या तातडीने सोडवा

10:43 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
जुने गांधीनगर ड्रेनेजची समस्या तातडीने सोडवा
Advertisement

परिसरातील नागरिकांची मागणी : दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Advertisement

बेळगाव : जुने गांधीनगर येथील ब्रह्मलिंग गल्लीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून ड्रेनेजची समस्या भेडसावत आहे. याबाबत महानगरपालिकेला निवेदन देवूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे येथील जनतेला या ड्रेनेजच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. ब्लॉक होत असल्यामुळे अनेकांच्या घरामध्ये ड्रेनेचे पाणी शिरत आहे. तेव्हा तातडीने त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. गांधीनगर परिसरात नेहमीच ड्रेनेजची समस्या भेडसावत आहे. पावसाळ्यात ड्रेनेच ब्लॉक होऊन पाणी घरामध्ये साचून राहात आहे. सध्या या परिसरात दुर्गंधी पसरली असून जीवन जगणे अवघड झाले आहे. महानगरपालिकेला अनेकवेळा याबाबत सांगण्यात आले. मात्र दुर्लक्षच होत आहे. तेव्हा तातडीने ही समस्या सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. काही महिन्यांपूर्वी नगरसेवक तसेच अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. त्याची दुरुस्ती करतो, असे सांगितले होते. मात्र त्यानंतर कोणीही फिरकलेच नाहीत. आता पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. तर अधूनमधून वळिवाचा पाऊसही होत आहे. तेव्हा तातडीने आताच त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या परिसरातील तीन ते चार चेंबर पूर्णपणे खराब झाले आहेत. त्याची नव्याने बांधणी करून त्याच्यावर झाकण देखील घातले पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

धोकादायक खुला चेंबर

Advertisement

रस्त्याच्या बाजूला गांधीनगर येथे खुला चेंबर ठेवला आहे. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असून त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. रात्रीच्यावेळी तर या चेंबरमध्ये कोणी तरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा महानगरपालिका याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement
Tags :

.