महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आंबेवाडी ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील गावांतील समस्या सोडवा

10:27 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

समस्या त्वरित सोडविण्याची दलित प्रगतीपर सेनेची मागणी : ग्राम पंचायत अध्यक्षांना निवेदन

Advertisement

वार्ताहर/अगसगे

Advertisement

आंबेवाडी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील आंबेवाडी, गोजगा व मण्णूर गावांमध्ये चार-पाच वर्षांपासून मागासवर्गीयांचा एससीपी अनुदानाचा योग्यरित्या उपयोग केला नसल्याने आणि तिन्ही गावांमध्ये मूलभूत सुविधांपासून ग्रामस्थ अद्याप वंचित आहेत. तरी मूलभूत सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी कर्नाटक दलित प्रगतीपर संघटनेच्या वतीने ग्रा.पं. अध्यक्षा व पीडीओ यांना देण्यात आले. पीडीओ चिदानंद जम्बगी, ग्रा.पं.अध्यक्षा लक्ष्मी यळगुकर यांनी समस्यांचे त्वरित निवारण करण्याचे आश्वासन दिले. गावातील नागरिकांनी गावासह आंबेडकर गल्लीत मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात आणि मागासवर्गीयांसाठी येणाऱ्या अनुदानाचा योग्यरित्या उपयोग करावा, असे वारंवार ग्राम पंचायतीला सांगितले होते. तरीदेखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मण्णूरमधील आंबेडकर गल्लीत कूपनलिका वर्षापासून नादुरुस्त आहे. दुऊस्ती करावी म्हणून ग्रामस्थांनी वारंवार ग्रा.पं.ला सूचना केली होती व विविध विकासकामे करावीत, अशा मागणीचे निवेदन अनेकवेळा दिले. अद्याप त्याचीही अंमलबजावणी झाली नाही.

गोजगा येथील कन्नड शाळेसमोर गटारीवर फरशा बसवल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रोज शाळेला जावे लागते. तसेच मराठी शाळेची देखील संरक्षक भिंत कोसळली आहे. ग्रा. पं. वसुली करामधील शेकडा 22 टक्के अनुदान अद्याप व्यवस्थित आजपर्यंत मागासवर्गीयांना दिले नाही. तसेच गावातील गटारी सांडपाण्याने भरल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे डेंग्यू-मलेरियासारखे आजार पसरत आहेत. तरी ग्रा.पं.ने तिन्ही गावांतील गटारी स्वच्छ कराव्यात आणि डासप्रतिबंधक औषधाची फवारणी करावी. नागरिकांना मूलभूत सुविधा आठ दिवसात उपलब्ध कराव्यात. असे न झाल्यास ग्रा.पं. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा राज्य दलित प्रगतीपर सेनेतर्फे दिला आहे. यावेळी सेनेचे राज्याध्यक्ष नागेश कांबळे, जिल्हाध्यक्ष शिवपुत्र मेत्री, अशोक चौगुले, मल्लेश कुरंगी, कृष्णा देवरमनी, लोकेश चौगुले, राजकमल मेत्री, कल्लाप्पा कांबळे, सेफ वॉर्ड समूहाचे अध्यक्ष संतोष मेत्री आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article