For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन तसेच मैलागाळ व्यवस्थापन हि काळाची गरज- शेखर रौंदळ

06:31 PM Aug 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन तसेच मैलागाळ व्यवस्थापन हि काळाची गरज  शेखर रौंदळ
Shekhar Raundal
Advertisement

राज्य पाणी व स्वच्छता मिशन स्वच्छ भारत मिशन यांच्या वतीने राज्यातील पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी , ग्रामीण पाणी पुरवठा विभाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता, जिल्हा स्वच्छता तज्ञ यांच्यासाठी राज्यस्तरीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी मलकापूर नगरपंचायत येथील मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प, बनवडी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प व हजारमाची सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी करण्यात आली.तसेच राज्यातील पहिल्या बायोटाईगर फिल्टर या नविन सांडपाणी व्यवस्थापन तंत्रदान प्रकल्पाचे फिल्टर प्लाॅंट मध्ये श्री शेखर रैादळ यांचे हस्ते गांडुळ सोडुन प्रकल्प कार्यन्वयीत करणेत आला.

Advertisement

याप्रसंगी राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ बोलताना म्हणाले की महाराष्ट्र राज्य स्वच्छतेमध्ये देशात कायम अग्रस्थानी राहिलेले आहे. प्रत्येक कुटुंबासाठी वैयक्तिक किंवा सार्वजनिक शौचालयाची सुविधा निर्माण करण्यात राज्य यशस्वी झाले आहे. वैयक्तिक शौचालयातील मैलाचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन करण्यासाठी सद्यस्थितीत नगरपंचायती, नगरपालिका व महानगरपालिका यांचे मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प आहेत त्याला लगतची गावे जोडून त्या गावातील मैलागाळाचे व्यवस्थापन करण्यात यावे व इतर गावांसाठी ग्रामपंचायतींचे सामूहिक गट तयार करून एकत्रित मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात यावेत. यासाठी मलकापूर नगरपंचायतीने केलेला प्रकल्प दिशादर्शक असून अशा प्रकारचे प्रकल्प ग्रामीण भागात उभारले जावेत असे आवाहन त्यांनी केले. मलकापूर नगरपंचायतीने केलेल्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प याबाबत मलकापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मनोहर शिंदे व मुख्याधिकारी श्री प्रताप माळी, प्रायमूव्ह संस्थेचे एस. डी. कुलकर्णी यांनी माहिती दिली. अभ्यास दौऱ्याचा समारोप सातारा जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये विविध विषयावर चर्चासत्र घेऊन व प्रेझेंटेशन च्या माध्यमातून मैलागाळ व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वाई नगरपालीकेच्या मैलागाळ व्यवस्थापनाच्या प्रकल्पाची माहिती स्नेहल भोसले यांनी दिली.तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या नवीन तंत्रज्ञाना विषयी चर्चासत्र घेणेत आले. यावेळी युनिसेफचे स्वच्छता समन्वयक जयंत देशपांडे, राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे वरिष्ठ तांत्रिक सल्लागार अमोल धनवडे, व्ही आर एस ईकोटेकचे रोहित पाटणकर, संदीप निकम व वाई नगरपंचायतीच्या स्नेहल भोसले व रीक्युज च्या प्राची मेंढे यांनी मैला गाळ व्यवस्थापन व त्या अनुषंगाने प्रकल्प उभारणीसाठीचे विविध तांत्रिक पर्याय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मा. अर्चना वाघमळे व पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे, कार्यकारी अभियंता संजय लाड, लेखाधिकारी सुनिल जाधव. कराड तालुक्याचे गट विकास अधिकारी प्रताप पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभुते, उप अभियंता जयदिप पाटिल कक्ष अधिकारी सुनिल रांजणे जिल्हा तज्ञ धनाजी पाटील, रवींद्र सोनवणे, ऋषिकेश शीलवंत, राजेश इंगळे, गणेश चव्हाण निलिमा सन्मुख यांनी योगदान दिले. तर समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश भोसले यांनी केले व आभार अजय राऊत यांनी मानले.

"राज्यस्तरीय मैलागाळ व्यवस्थापन अभ्यास दौरा जिल्हयात पार पडला. या अभ्यास दौऱ्यामध्ये सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर पंचायत .ग्रामपंचायत हजारमाची व बनवडी या गावांची मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प व प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी ३४ जिल्ह्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता. उप अभियंता व स्वच्छता तज्ञ उपस्थित होते. राज्यस्तरावरुन अभ्यास दौऱ्याचे नियोजन केल्यामुळे जिल्हयातील केलेली उल्लखनिय कामे सर्व ३४ जिल्हयात पोहचविण्यासाठी मदत होणार आहे"

Advertisement

Advertisement
Tags :

.