सोलेक्स एनर्जीला मिळाली मोठी ऑर्डर
नवी दिल्ली : सोलक्स एनर्जी लिमिटेड या कंपनीला स्मार्ट सोलर स्ट्रीट लाईट सिस्टीमसाठी रिमोट मॉनिटरिंग सिस्टीमसह देखभालीचे काम मिळाले आहे. ही ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीच्या समभागांमध्ये जवळपास 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. शेअर बाजारात अप्पर सर्किट रेंजपर्यंत प्रवास झाल्याचे दिसून आले. सोलेक्स एनर्जी कंपनीला औरंगाबाद येथील जिल्हा पंचायत राज अधिकारी यांच्याकडून स्मार्ट सोलर स्ट्रीट लाईट सिस्टमसाठी रिमोट मॉनिटरिंग सिस्टीमसह देखभाल करण्यासाठीचा करार जवळपास 3,06,69,100 इतक्या किंमतीचा करण्यात आला आहे. सोलेक्स एनर्जी कंपनी ही सौर पॅनेल आणि इतर अक्षय ऊर्जा उपकरणे तयार करणारी कंपनी आहे. तसेच ती अभियांत्रिकी, खरेदी व बांधकामावर आधारीत प्रणाली स्थापन करण्याचे काम करते.
समभागाचा परतावा
सोलेक्स एनर्जीचे समभाग गुरुवारी 1576.90 रुपयांवर राहिले आहेत. यासह कंपनीचे सध्याचे बाजारमूल्य हे 1261.52 कोटी रुपये आहे. केवळ सहा महिन्यांमध्ये समभाग हे 175 टक्क्यांहून अधिकने वाढले आहेत.