For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात जवान हुतात्मा

06:55 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात जवान हुतात्मा
Advertisement

पुंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर गोळीबार : 4 जवान जखमी : दोघांची प्रकृती चिंताजनक

Advertisement

वृत्तसंस्था/ पुंछ

जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या सुरक्षा वाहनांवर गोळीबार केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात एका जवानाला हौतात्म्य प्राप्त झाले असून अन्य 4 सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. जखमींना हवाई अॅम्ब्युलन्सद्वारे उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Advertisement

सुरक्षा दलाची वाहने पुंछ जिह्यातील सुरनकोट भागातील सनई टॉपकडे जात असताना शशिधरजवळ सायंकाळी दहशतवाद्यांनी वाहनताफ्यावर हल्ला केला. या घटनेनंतर संपूर्ण परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सुरनकोटच्या सनई गावात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी लष्कर आणि पोलिसांना तातडीने या भागात पाठवण्यात आले. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

अनंतनागमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले, जवान हुतात्मा

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिह्यात लष्कराच्या वाहनाला अपघात झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिह्यातील वेरीनाग भागात लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने एका जवानाला प्राण गमवावे लागले. तसेच नऊ जवान जखमी झाले आहेत. बटागुंड वेरीनाग येथे लष्कराच्या 19 आरआरचे वाहन रस्त्यावरून दरीत कोसळले. यात एका जवानाच्या हौतात्म्याची पुष्टी लष्करी सूत्रांनी दिली. जखमी जवानांना तातडीने जवळच्या ऊग्णालयात आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.