कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक कार वेव्ह ईव्हीए

07:00 AM Jan 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पूर्ण चार्जवर 250 किमी रेंज प्राप्त करणार : एक्स-शोरूम किंमत 3.25 लाख रुपये

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप वेब मोबिलिटीने अलिकडेच भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक कार, वेव्ह ईव्हीए लाँच केली. यावेळी कंपनीने दावा आहे की, ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 250 किलोमीटर धावेणार. घरगुती चार्जरने कारची बॅटरी 5 तासांत आणि डीसी फास्ट चार्जरने 20 मिनिटांत चार्ज होणार आहे. तसेच कारच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यात आले आहे, जे 10 किलोमीटरची अतिरिक्त रेंज देणार असल्याचा दावाही केला आहे. वेव्ह ईव्हीए ही क्वाड्रिसायकलसारखीच एक छोटी कार आहे. त्यात 2 व्यक्ती आणि एक मूल बसू शकते.

ही ईव्ही 5 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. ही कार एमजीच्या कॉमेटशी स्पर्धा करेल. 2023 च्या ऑटो एक्स्पोमध्ये ती पहिल्यांदा तिच्या संकल्पना अवतारात सादर करण्यात आली. सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 3.25 लाख रुपये आहे.  ती बॅटरी सबक्रिप्शन प्लॅनच्या स्वरूपात येते. तर, ग्राहक 3.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत बॅटरी सबक्रिप्शनशिवाय ईव्ही खरेदी करू शकतील. या किमती पहिल्या 25,000 ग्राहकांसाठी असतील, ज्याची डिलिव्हरी 2026 मध्ये सुरू होईल. कंपनीने सांगितले की वेव्ह ईवा लवचिक सौर पॅनेलने सुसज्ज आहे, ज्याद्वारे कार दररोज 10 किलोमीटर धावू शकते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article