Solapur News | सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीच्या सभापतींची निवड २० मार्च पूर्वी होणार
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पद ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव
सोलापूर -जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल ७ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर निवडून आलेले सदस्य अजूनही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सभागृहाबाहेरच आहेत. राज्य शासनाने २० मार्च पूर्वी जि. प. अध्यक्ष व पंचायत समिती सभापती यांची निवडी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.
राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्यात घेण्यात आले. त्यामुळे आता जिल्हा परिषद सदस्यातून व पंचायत समिती सदस्यांतून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापती व उपसभापति यांची निवड करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या या निवडीसाठी दिवस ठरविण्याचे नियोजन आखण्यात येत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर पंचायत प्रातांधिकारी किंवा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहेत.
परिषद सोलाप नसेवा हीच ईशसेवा समिती सभापतीच्या निवही जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित आहे. तर पंचायत समिती सभापतीचे आरक्षणही यापुर्वीच निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षणानुसार इच्छुक उमेदवारांनी यापुर्वीच राजकीय गॉडफॉदरकडे फिल्डींग लावली आहे. यात गॉडफॉदरकडून कोणत्या इच्छुकाच्या पदरी पद पडणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.