For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur market | उन्हाचा पारा ४० पार, पण भाज्यांचे दर जमिनीवर! सोलापूर मार्केटमधील 'थंडावा' ग्राहकांसाठी ठरतोय सुखद धक्का

03:34 PM May 06, 2026 IST | NEETA POTDAR
solapur market   उन्हाचा पारा ४० पार  पण भाज्यांचे दर जमिनीवर  सोलापूर मार्केटमधील  थंडावा  ग्राहकांसाठी ठरतोय सुखद धक्का
Advertisement

                                      सोलापूर बाजारात भाज्यांचे दर स्थिर

Advertisement

सोलापूर -सध्या कडक उन्हाळा सुरु असला तरी बाजारात सर्वच भाज्यांचे दर हे स्थिर आहेत. मात्र फळांचे दर मात्र चांगलेच वधारले आहेत. तसेच सध्या कडक उन्हामुळे लिंबूचा दर हा प्रति क्विंटल १२ हजारावर पोहोचला आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात मोठी वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक देखील चांगलीच मंदावली आहे.

त्यामुळे दर वाढतील असे वाटत होते. मात्र सध्या बाजारात सर्वच भाज्यांचे दर हे ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. सध्या थोड्या प्रमाणात ढोबळी मिरची, गवार, घेवडा, कारली या फळभाज्यांचे दरात वाढ दिसून येत आहे. तर कोथिंबीर दहा ते
सोळा रुपये प्रति जुडी मिळत आहे. तर टोमॅटोसुध्दा गेल्या आठवडी दरापेक्षा या आठवडी पाचे ते दहा रुपयाने वाढ झाली आहे.

Advertisement

बाजारसमितीकडून आलेले किमान व कमालमध्ये बाजारभाव पुढीलप्रमाणे: कारली-२००० ते ३५००, वांगी ६०० ते ३०००, कोबी-५०० ते १०००, ढबळी मिरची-१२०० ते ४०००, गाजर-१००० ते ४०००, प्लॉवर-३२० ते ११२०, गवार १५०० ते ४०००, कोथिंबीर-१००० ते १६००, काकडी- ५०० ते ३०००, लसून (सुका) ४७०० ते१६५००, घेवडा-४००० ते ४०००, मिरची (हिरवी)-१२०० ते ३०००, भेंडी-८०० ते ३०००, लिंबू-१००० ते १२०००, कांदा (लाल)- १०० ते १६००, बटाटा-७०० ते १२००, दोडका (शिराळी)- १००० ते ५०००, टोमॅटो-५०० ते २५०० पालेभाज्या शंभर जुडीचा भाव : कांदा पात ६०० ते ७००, चाकवत- १००० ते १४००, अंबाडी भाजी- ४०० ते ७०० फळे विवंटलचा भाव सफरचंद- १०००० ते १००००, चिकु-१००० ते २५००, आंबा हापूस (पेटी) ४०० ते ३०००, आंबा लोकल- २००० ते ६०००, बीट-५०० ते १६००, पपई-५०० ते १०००, अननस-१२०० ते ३५००, डाळींब-१००० ते १८०००, कलिंगड-३०० ते १५०० भुसार मालाचेभाव क्विंटलमध्ये-गहू (शरबती)-२६०० ते ३९५०, ज्वारी (मालदांडी)-३८७० ते ३८७०, तांदुळ (मसुरा) ३४७० ते ६८१०, हरभरा (गरडा) - ५००० ते ५२९०, गुळ (पिवळा) ४१४० ते ४३८८.

Advertisement
Tags :

.