सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची ‘श्री मंद्रूपच्या राजा’ला सदिच्छा भेट
मंद्रूप | प्रतिनिधी : अभिजीत जवळकोटे : सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंद्रूप येथील माळी गल्ली परिसरातील मानाच्या मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर गणेशोत्सव मंडळाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ‘श्री मंद्रूपचा राजा’ गणरायाचे दर्शन घेत पूजा व आरती केली.
या भेटीदरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मंडळासमोरील प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली.
मंडळाच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ आणि ‘श्री मंद्रूपचा राजा’ बाप्पांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे, मंडळाचे अध्यक्ष उमेश हेळकर, प्रशांत जोडमोटे, शिवराज कालदे, मिथुन मुगळे, सुरेश काका स्वामी, दयानंद ख्याडे, रवी नंदुरे, म्हाळप्पा घाले, शिवराज मुगळे सर, सागर घाले, निरंजन ख्याडे, विनायक ख्याडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सभासद आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंडळाला दिलेल्या सदिच्छा भेटीबद्दल मानाचे मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.