For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोलापूर सात रस्ता येथे धोकादायक गतिरोधकामुळे महिलेचा मृत्यू; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

02:42 PM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
सोलापूर सात रस्ता येथे धोकादायक गतिरोधकामुळे महिलेचा मृत्यू  दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
Advertisement

सोलापूर : सात रस्ता येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धोकादायक गतिरोधकामुळे झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर प्रशासनाने गतिरोधकावर पांढरे पट्टे मारून दिशादर्शक फलक लावले. मात्र, हे काम अपघातापूर्वीच करण्यात यायला हवे होते, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते सागर टूरके आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Advertisement

नवीन गतिरोधक तयार होऊन सुमारे 15 दिवस झाले होते. मात्र, त्यावर पांढरे पट्टे किंवा वाहनचालकांना सूचना देणारे फलक नसल्याने रात्रीच्या वेळी तो स्पष्ट दिसत नव्हता, असा दावा करण्यात आला आहे. याच कारणामुळे अपघात होऊन महिलेचा जीव गेल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

अपघातानंतर प्रशासनाने तातडीने गतिरोधकावर रंगकाम करून दिशादर्शक फलक बसविल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. संबंधित विभागाच्या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच मृत महिलेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मातृभूमी सेवा संघ आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Advertisement

प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Advertisement
Tags :

.