Solapur News भावोजी भडकले, थेट मेव्हण्यालाच डंबेल्सने मारहाण, तिघांविरोधात गुन्हा दाखल
राग अनावर होऊन मेव्हण्याला डंबेल्सने मारण्याची घटना सोलापुरातून समोर आली आहे. मेहुण्याला क्रूर मारहाण करणाऱ्या भावोजीसह तिघांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सरफराज महिबूब शेख (रा. नॉर्थ कसबा, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून शोएब गुलाम मोमीन, गुलाम मोमीन, फिरोज मुलाणी (रा. साखर पेठ, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
९ जून रोजी सायंकाळी सरफराज शेख, भाऊ अबुबकर असे मिळून त्यांची बहीण अशिया हिच्या साखर पेठेतील घरी गेले होते. त्यावेळी सरफराज याचा भावोजी शोएब मोमीन याने सरफराज यास, “तुम्ही कोण घरी येऊन मला सांगणारे, तुमची बहीण आता माझी बायको आहे, तुमचा काही संबंध नाही,” असे म्हणून सरफराज यांच्या अंगावर धावून येऊन घरातील डंबेल्सने शेख यांच्या छातीवर मारण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी शेख यांच्या हाताला, पाठीवर दुखापत केली. तसेच अबुबकर यांच्या डोळ्याखाली दुखापत केली आहे. तसेच गुलाम व फिरोज यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व घराबाहेर काढले. Nयाबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार खुणे तपास करीत आहेत.