Solapur News : आजपासून सलग पाच दिवस रुक्मिणी महोत्सव
06:02 PM Mar 01, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन
सोलापूर :
महाराष्ट्र राज्य उमेद योजनेअंतर्गत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी १ ते ५ मार्च या कालावधीत सोलापुरात रुक्मिणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत महिला स्वयंसहायता समूहांचे सामाजिक व आर्थिक सबलीकरण करण्यात येत आहे.
उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत महिला स्वयंसहायता समूहांचे सामाजिक व आर्थिक सबलीकरण करण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून स्वयंसहायता समूहाने उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मागील दोन वर्षांपासून मिनी सरस प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे व त्यास स्थानिकांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. यंदा नॉर्थकोट मैदान, महानगरपालिका समोर सोलापूर येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येत आहे.
या महोत्सवात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या निर्मिती व विक्रीला अधिकाधिक प्रोत्साहित करणे तसेच शहरी भागातील नागरिकांना विविध वस्तू, पदार्थ व स्वादिष्ट खाद्यपदार्थची याशिवाय ग्रामीण महिलांच्या कलागुणांना व कौशल्याला वाव या प्रदर्शनातून मिळणार आहे. चव चाखण्याची संधी मिळणार आहे.
या प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकूण ७५ व इतर जिल्ह्यातील ५ स्टॉल सहभागी होणार आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण व विशेष उत्पादने यामध्ये सोलापुरी कडक भाकरी, शेंगाचटणी, दुग्धजन्य पदार्थ, हस्तकला वस्तु, लाकडी बैलगाडी व खेळणी, कापडी पिशवी, लोकरी जेन धोंगडी, मिलेट् पदार्थ व कुकीज, मसाले, कोल्हापुरी चप्पल, सेंद्रिय डाळी, बजारा आर्ट, फळे व भाजीपाला उत्पादने, लोकरी वस्तू याबरोबरच जेवणाची मेजवानी यामध्ये खेकडा, उजनी मासे, बिर्याणी व शाकाहारी जेवण, पंढरपूरची बाजार आमटी यांची मेजवानी असणार आहे.
सोलापूर शहरातील नागरिकांनी यावेळी उपस्थित राहून ग्रामीण पदार्थ व उत्पादने यांची खरेदी करावी व अस्सल ग्रामीण मेजवानीचा आस्वाद घ्यावा. तसेच प्रदर्शन कालावधीत प्रदर्शन स्थळी भेट देऊन ग्रामीण भागातील महिलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे उपस्थित होते.
Advertisement
Advertisement