Solapur News | सोलापूर मनपाचा मोठा निर्णय; वैद्यकीय कचरा लपविणाऱ्या रुग्णालयांची आता खैर नाही!
सोलापूर शहरातील १ हजारहून अधिक रुग्णालये मनपाच्या रडारवर
सोलापूर - शहरातील अनेक रुग्णालये महापालिकेच्या वैद्यकीय कचरा संकलन करण्प्रया मक्तेदाराकडे कचरा देत नाहीत. हा कचरा नेमका कुठे जातो, शहरातील किती रुग्णालयांनी महापालिकेकडे नोंदणी केली याची तपासणी होणार आहे. या तपासणीची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात आरोग्य विभागाला उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून शहरात वैद्यकीय कचऱ्याचे संकलन केले जाते. यासाठी मक्तेदार नेमला आहे, परंतु, शहरातील अनेक रुग्णालये, लॅबकडील कचरा या मक्तेदाराकडे येत नसल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच रुग्णालयांची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय झाला. नोंदणी न करणाऱ्या वैद्यकीय कचऱ्यावर मनपाचा अंकुशकारवाई झाला. रुग्णालयांवर दंडात्मक करण्याचा निर्णय महापालिकेकडे नोंदणी झाल्यास उत्पन्नात वाढ होणार आहे.
दुसरीकडे, घोकादायक कद्रयाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागणार असल्याचे काळे यांनी सांगितले. शहरात एक हजार रुग्णालयांनी महापालिकेच्या मक्तेदाराकडे नोंदणी केली आहे. आणखी ब्रयाच रुग्णालयांनी नोंदणी केली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या सर्वांची तपासणी आवश्यक आहे. यातून पालिकेला उत्पन्न मिळेल. मात्र यंत्रणांच्या ढिसाळपणामुळे कचरा संकलित होत नाहीजैव वैद्यकीय कचरा हाताळणी व विल्हेवाटीचे नियम कडक आहेत. मात्र यंत्रणांच्या ढिसाळपणामुळे हा कचरा संकलित होत नाही. उघड्यावरील जैव वैद्यकीय कचऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
कद्रयाची विल्हेवाट लावण्याचा हेतू सफल होणार आहे, असे महापालिका सभागृह नेतानरेंद्र काळे यांनी सांगितले. सोलापूरमध्ये जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन भोगाव येथील प्रकल्पाद्वारे
केले जाते, ज्याची जबाबदारी जानेवारी २०२४ पासून एस. एस. सर्व्हिसेस कडे आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार, रुग्णालयांनी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे बंधनकारक असून, यावर 'जीपीएस' द्वारे देखरेख ठेवली जाते.
भोगाव येथे सोलापूर महानगरपालिकेचा सामाईक जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यरत आहे. बायोक्लिन सिस्टिम्स इंडिया प्रा. लि. चा करार संपल्यानंतर, आता एस. एस. सर्व्हिसेस या कंपनीची ५ वर्षांसाठी प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नियमांनुसार, धोकादायक वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. रुग्णालयांच्या गाड्यांवर जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. या प्रकल्पात रुग्णालयातील संसर्गजन्य कचरा, सुया, टाकाऊ औषधे आणि इतर जैववैद्यकीय टाकाऊ वस्तूंची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.