For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | रक्षाबंधनासाठी सोलापूरच्या बाजारपेठा सजल्या; राख्यांची मोठी आवक

04:35 PM Aug 27, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   रक्षाबंधनासाठी सोलापूरच्या बाजारपेठा सजल्या  राख्यांची मोठी आवक
Advertisement

सोलापूर -रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने सोलापूर शहरासह तालुक्यातील बाजारपेठांमध्ये राख्यांची मोठी आवक झाली आहे. मधला मारुती, नवी पेठ यासह प्रमुख बाजारपेठा विविध प्रकारच्या आकर्षक व नावीन्यपूर्ण राख्यांनी सजल्या असून, खरेदीसाठी बहिणींची लगबग सुरू झाली आहे.

Advertisement

यंदा पारंपरिक राख्यांसोबत फॅन्सी, कपल, किड्स, कुंदन, राजवाडी, जयपूर मोती, दोऱ्यांच्याराख्यांना मोठी मागणी आहे. लहान मुलांसाठी कार्टून व रंगीबेरंगी डिझाईनच्या राख्या विशेष आकर्षण ठरत आहेत. बाजारात १० रुपयांपासून तब्बल १ हजार रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध आहेत. चांदीच्या राख्यांनाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.

भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा धागा अधिक घट्ट करणाऱ्या राखीच्या सेटला यंदा विशेष मागणी आहे. या सेटमध्ये भाऊ आणि वहिनीसाठी एकाच डिझाईनच्या दोन राख्या दिल्या जातात.

Advertisement

Advertisement
Tags :

.