Ramzan Eid 2026 | सोलापूरात चटकदार खाद्यपदार्थांचा भरला बाजार ; रमजान सणानिमित्त निमित्त खवय्यांची गर्दी
05:32 PM Feb 27, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
सोलापुरात रमजान निमित्त खाद्यपदार्थांची रेलचेल
Advertisement
सोलापूर - रमजानचा महिना सुरू झाला असून रोजे सोडण्यासाठी विविध प्रकारच्या चटकदार, मसालेदार पदार्थांचा सोलापुरात बाजार भरला आहे.
ईद निमित्त सोलापूर येथील किडवई चौक मशिदीशेजारी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लागले आहेत. या स्टाॕलवर खवय्यांची प्रचंड गर्दी होत आहे. स्टॉलमध्ये विविध चटकदार खाद्यपदार्थ व स्वीट डिशेशची मेजवानी पहायला मिळत आहे.
या मध्ये झटपट शीक, चिकन शीक ,मटन शीक ,बदाम रबडी, कुर्बानी का मीठा, खदरा फ्राय, हलवा फ्राय, फिश फिंगर, चना कोळीवाडा, तुर्कीस कुनाफा, चिकन गुलाब खास,अशा असंख्य खाद्यपदार्थांची लजीज मेजवानी लागली आहे. याची चव घेण्यासाठी मुस्लिम बांधवांसह, इतर धर्मीयांनीही मोठी गर्दी केल्याचे दिसून येते.
Advertisement
Advertisement