For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

मराठा आरक्षण आंदोलनामुळे लालपरीला फटका! नुकसान टाळण्यासाठी जिल्हाभरातील एसटी सेवा बंद

06:18 PM Oct 31, 2023 IST | Abhijeet Khandekar
मराठा आरक्षण आंदोलनामुळे लालपरीला फटका  नुकसान टाळण्यासाठी जिल्हाभरातील एसटी सेवा बंद

स्थानकात शुकशुकाट, नऊही आगारातील बस जागेवरच: खासगी वाहन मिळवण्यासाठी प्रवाशांना करावी लागली कसरत

सोलापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होत असल्याने एसटीचे नुकसान होणार नाही यासाठी मंगळवारीही जिल्हाभरातील एसटीची वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मिळेल त्या वाहनांतून प्रवास करताना नागरिकांची मोठी गैरसोय झाली. सोलापूर, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, अकलूज, करमाळा, सांगोला, कुर्डुवाडी, मंगळवेढा यासह जिल्ह्यातील बसस्थानकात दिवसभर शुकशुकाट होता.

Advertisement

मराठा आरक्षण दिवसे दिवस आंदोलन तीव्र होत आहे. अनेक गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर अनेक गावात साखळी उपोषण, रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. आता या आंदोलनात महिलांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसे दिवस तीव्र होत आहे. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याने एसटी महामंडळ सतर्क झाले आहे. एसटीचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेत रविवारी दुपार पासून जिल्ह्यातील सर्व बस जागेवर थांबवण्यात आल्या होत्या. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यायातील नऊही आगारातील बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.

सोलापूर विभागातील एकूण नऊ आगारातील जवळपास ७१५ बस रद्द करण्यात आल्या आहेत. यात सोलापूर विभागातील ९३१ फेऱ्या ऐवजी ८९२ फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ८५ हजार ३९८ किलोमीटर प्रवास रद्द करण्यात आला आहे. एकूण २९ लाख ९४ हजार ९०८ रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. मंगळवारी देखील बस बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. खासगी वाहनातून प्रवास करताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. खासगी वाहनेही अपुरी पडली. त्यामुळे प्रवाशांना उन्हात दिवसभर मिळेल त्या खासगी वाहनांतून प्रवास करावा लागला.

Advertisement

सर्व बसस्थानके दुसऱ्यादिवशीही पडली ओस
रविवारी बंद करण्यात आलेली एसटीची वाहतूक सोमवार आणि मंगळवारी ही रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशी बसस्थानकात फिरकलेच नाहीत. त्यामुळे नेहमीच गजबजलेल्या बसस्थानकात सोमवारी शुकशुकाट पहावयास मिळाला. सोलापूर, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, अकलूज, करमाळा, सांगोला, कुर्डुवाडी, मंगळवेढा बसस्थानकातही हेच चित्र पहावयास मिळाले.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.