For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : पूर्व वैमनस्यातून झालेल्या हाणामारीप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

02:51 PM May 31, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur news    पूर्व वैमनस्यातून झालेल्या हाणामारीप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल
Advertisement
सोलापूर  :  जुन्या मांडणाच्या कारणावरून लोथी गल्ली परिसरात झालेल्या हाणामारीप्रकरणी दोन्ही गटातील १६ जणांविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुमित सूरज शिवशिंगवाले (रा. लोधी गल्ली, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रताप मनसावाले, रोहन मनसावाले, कृष्णा मनसावाले, धनराज मनसावाले, गोविंद मनसावाले व इतर तीन जण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर गोविंद अनिल मनसावाले (रा. कुमठा नाका, पारशी विहिरीजवळ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम शिवशिंगवाले, सूरज शिवशिंगवाले, दीपक शिवशिंगवाले, अजय शिवशिंगवाले, राज शिवशिंगवाले, आदित्य शिवशिंगवाले, अर्जुन शिवशिंगवाले, तानशा शिवशिंगवाले (रा. सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२८ मे रोजी सुमित शिवशिंगवाले याचा भाऊ शुभम हा प्रताप मनसावाले याच्या घरासमोरून जात होता. त्यावेळी मनसावाले याची पत्नी ही झाडू मारत असताना शुभमच्या अंगावर कचरा उडाला. त्याबाबत शुभमने विचारणा केली असता त्यात वाद झाला होता दुपारी झालेल्या या वादावरून तसेच रात्री जुन्या भांडणाचा राग मनात धरून इनडोअर स्टेडियम शेजारी शिवशिंगवाले याच्या पोटात चाकू खुपसून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
तर इतरांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, अशी नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. तर गोविंद मनसावाले याच्या फिर्यादीनुसार २८ मे रोजी रात्री नवनीत हॉस्पिटलसमोर पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून गोविंद यास शिवशिंगवाले यांनी कोणत्यातरी धारदार हत्याराने पोटावर मारून जखमी केले. तसेच इतरांनी हातातील कड्याने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
Advertisement
Advertisement
Tags :

.