For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur weather | पारा ४४ अंशांच्या उंबरठ्यावर, पण मे महिन्यात नेमकं काय घडलं? सोलापूरकरांना मिळालेला तो अनपेक्षित 'थंडावा'!

02:14 PM May 06, 2026 IST | NEETA POTDAR
solapur weather   पारा ४४ अंशांच्या उंबरठ्यावर  पण मे महिन्यात नेमकं काय घडलं  सोलापूरकरांना मिळालेला तो अनपेक्षित  थंडावा
Advertisement

                    सोलापुरात ४४ अंशांपर्यंत गेलेला पारा आता खाली

Advertisement

सोलापूर -  सोलापूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सोलापूरचा पारा चांगलाच चढला होता. एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यात सोलापूरचा पारा जवळपास ४४ अंशापर्यंत चढला गेला होता. त्यामुळे सोलापूरकर उष्णतेने चांगलेच त्रस्त झाले होते. मे महिन्यात पारा आणखीन चढण्याचा अंदाज असतानाच पारा तीन अंशाने उतरल्याने सोलापूररांना दिलासा मिळाला आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे काही प्रमाणात सोलापूरकरांना दिलासा मिळाला. त्यानंतर १५ एप्रिलपासून सोलापूरचा पारा रोजच वाढत होता. त्यामुळे मे महिन्यातील पारा ४४ अंशाच्याहीपुढे सरकरण्याचा अंदाज सोलापूकरांतून व्यक्त होत होता. सोमवार ४ मे रोजी सोलापूरचे कमाल तापमान ४०.८ इतके होते. त्यापूर्वीच्या दोन दिवसातील तापमानही ४२ अंशाच्या आसपास होते.

Advertisement

त्यामुळे कडक उन्हाळ्याचा मे महिना सुरुवातीलाच सोलापूकरांसाठी दिलासा देणारा ठरला गेला आहे.मागील महिन्यात कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहतूक विस्कळीत होताना दिसून येत होती. रस्त्यावरीलवाहनांची वर्दळ यावेळी तुरळक दिसून येत होती. गेल्या तीन दिवसात सोलापूरच्या तापमानात घट झाल्याने दुपारच्या वेळीही शहरातील रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पुन्हा वाढली असल्याचे दिसून येत आहे. सोलापूरचा पारा जरी उतरला असला तरी दुपारच्या कडकउन्हापासून संरक्षण मिळविण्यासाठी सोलापूरकर महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. दुपारी बारापासून ते रात्री उशिरापर्यंत शहरातील ज्युस, आईस्क्रीम व रसपान गृहात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.

आंबे स्वस्त झाल्याने आमरसला पसंती
मागील महिन्यात आंब्याचा दर वधारला होता. मात्र अवकाळी पावसामुळे आंब्याच्या दरात घसरण झाली असून केशरी आंबे शंभर रुपयास दिड किलो प्रमाणे विक्रीस बाजारात आले आहेत. त्यामुळे आंबे खरेदी करुन आमरसचे सेवन करण्यासाठी सोलापूरकरांची सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.