Solapur News : प्रतिबंधित गुटखा पानमसाल्याचा १. २१ लाखांचा साठा जप्त
03:05 PM May 31, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
सोलापूर ; अन्न व औषध प्रशासनाच्या सोलापूर कार्यालयाने गुटखा, पानमसाला आणि मावा यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थाविरोधात विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली. २५ ते २९ मे या कालावधीत करण्यात आलेल्या सहा कारवायांमध्ये १ लाख २१ हजार ३७२ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत तसेच अन्न सुरक्षा व मानके सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई अधिनियम २००६ मधील कलम २६, २७, ३० व ५९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली. कारवाईदरम्यान सुमारे ५० हजार रुपये किमतीचे एक वाहन जप्त करण्यात आले असून पाच आस्थापनांना सील ठोकण्यात आले आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे विभागाचे सहआयुक्त भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा अधिकाऱ्यांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही मोहीम राबवली. प्रतिबंधित अन्नपदार्वांची विक्री, उत्पादन, साठवणूक अथवा वाहतूक करणायांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या तक्रारीसाठी अन्न व औषध १८००-२२२-२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Indian Nyaya Sanhita Case
Advertisement
Advertisement