For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : सोलापूर विभागाची रेल्वे विद्युतीकरणात मोठी झेप

04:53 PM Mar 01, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   सोलापूर विभागाची रेल्वे विद्युतीकरणात मोठी झेप
Advertisement

   सोलापूर रेल्वेची पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल 

Advertisement

सोलापूर : इलेक्ट्रिक ट्रॅक्शन पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ट्रॅक्शन डिस्ट्रिब्युशन (टीआरडी) विभागासाठी अत्याधुनिक आठ चाकी टॉवर वॅगनचा समावेश केला आहे.

या निर्णयामुळे विद्युतीकृत मार्गावरील ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) देखभाल आणि तपासणी अधिक कार्यक्षम व सुरक्षित होणार आहे. नवीन टॉवर वॅगन वाढीव स्थिरता, उच्च सुरक्षा मानके आणि जलद कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्यात आले आहे.

Advertisement

यामुळे देखभाल पथकांना ओएचई कामे अधिक प्रभावीपणे पार पाडता येणार असून बिघाडांची शक्यता कमी होऊन रेल्वे सेवांची विश्वासार्हता वाढणार आहे. महत्वाचे म्हणजे, पारंपरिक १ बाय २५ केव्ही एसी ट्रॅक्शन सिस्टिमवरून प्रगत २ बाय २५ केव्ही एसी ट्रॅक्शन सिस्टिममध्ये अपग्रेडेशनसाठी ही टॉवर वॅगन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

वाढती वाहतूक, जास्त वीज मागणी आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या दृष्टीने हे तांत्रिक संक्रमण अत्यावश्यक मानले जात आहे. या समावेशानंतर सोलापूर विभागाकडे एकूण ११ टॉवर वॅगन उपलब्ध झाल्या असून ओएचई तपासणी, प्रतिबंधात्मक देखभाल आणि पुनर्संचयित कामे अधिक वेगाने करता येणार आहेत.

वाढलेल्या उपलब्धतेमुळे नियमित तपासणी आणि वेळेवर दुरुस्ती शक्य होऊन मोठे बिघाड टाळण्यास मदत होईल. या उपक्रमाचा थेट फायदा प्रवासी तसेच मालवाहतूक सेवांना होणार असून वेळेवर धावणाऱ्या गाड्या, सुधारित कार्यक्षमता आणि अधिक सुरक्षितता सुनिश्चित होणार आहे.

सोलापूरचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या हस्ते या ८-चाकी टॉवर वॅगनचे उद्घाटन करण्यात आले. आधुनिकीकरण आणि पायाभूत सुविधा उन्नतीच्या दिशेने सोलापूर विभागाने उचललेले हे पाऊल भविष्यासाठी सज्ज, विश्वासार्ह आणि कार्यक्षम रेल्वे सेवेकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.


Advertisement
Tags :

.