For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur news | सोलापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 'डिजिटल अरेस्ट' करणाऱ्या ठगाला दिल्लीतून बेड्या

03:49 PM Mar 27, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   सोलापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई   डिजिटल अरेस्ट  करणाऱ्या ठगाला दिल्लीतून बेड्या
Advertisement

                       सोलापुरात 'डिजिटल अरेस्ट'चा बनाव; 

Advertisement

सोलापूर -डिजिटल अरेस्ट करून फसवणाऱ्यास सोलापूर सायबर पोलीसांनी दिल्लीतून अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून ९ लाख ५० हजारांची रोकड जप्त केली आहे. राघवेंद्र सिंग पिता मुलचंद (वय ३८, रा. हायटेंशन रोड, कपातहंडा, दक्षिण-पश्चिम नवी दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्यांचे नाव आहे.

२८ जुलै २०२५ रोजी फिर्यादी घरी असताना त्यांना कॉल आला. टेलिकॉम विभागातून बोलत असल्याचे सांगून त्या व्यक्तीने फिर्यादीस तुमच्या सिमकार्डचा गैरवापर कुलाबा पोलिस ठाण्यातून विजय खन्ना झाल्याचे सांगितले. काही वेळाने दुसऱ्या व्यक्तीने फिर्यादीस कॉल केला. पुन्हा एकाने 'सीबीआय'मधून प्रवीण सूद बोलत असल्याचे सांगून गुन्ह्याची माहिती दिली. 'नरेश गोयल या व्यक्तीला मनी लॉड्रिंग प्रकरणी पोलिसांनी अटक केली आधारकार्ड, बँक खात्याची माहिती असून त्याच्याकडे तुमचे सिमकार्ड, मिळाली', असे फिर्यादीस सांगितले.

Advertisement

इंग्रजीतील तीन पाने पाठवून त्यात सुप्रीम कोर्टाची नोटीस असल्याचे सांगितले. त्यावेळी घाबरलेल्या फिर्यादीने सायबरगुन्हेगारांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या बँक खात्यांत २१ लाख २५ हजार १६१ रुपये पाठविले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर एक्सपर्ट टीमने तांत्रिक विश्लेषन व इतर पुरावे यादवारे दिल्ली येथून राघवेंद सिंग यास अटक केली. पोलिसांनी संशयित आरोपीची संपूर्ण माहिती काढून एका संशयिताला दिल्ली येथून अटक करून सोलापुरात आणले. त्याच्याकडून ९ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.