For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

धाराशिवमध्ये बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा, पिस्टलचा धाक धाकवत भरदिवसा बँक लुटली, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, जिल्ह्यात खळबळ

09:45 PM Dec 23, 2023 IST | Abhijeet Khandekar
धाराशिवमध्ये बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा  पिस्टलचा धाक धाकवत भरदिवसा बँक लुटली  संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद  जिल्ह्यात खळबळ

जिल्हा प्रतिनिधी

Advertisement

धाराशिव : धाराशिव शहरातील मुख्य भागातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट या बँकेवर भरदिवसा अज्ञात दरोदेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला असुन पिस्टेल व चाकूचा धाक दाखवून दरोडा घातल्याने खळबड उडाली आहे. हि संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव शहरातील मुख्य चौकातील जिल्हा स्टेडियमच्या जवळ असलेल्या सुनील प्लाझा येथील ज्योती क्रांती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही बँक दिवसाढवळ्या लुटण्यात आली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश करुन बँकेतील कर्मचाऱ्यांना पिस्टेल व चाकूचा धाक दाखवत हातपाय बांधून तोंडाला चिकटपट्टी बांधून दरोडा घातला. यामध्ये लाखों रुपयांचा मुद्देमाल व सोने चोरुन नेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन तपास सुरु आहे. सीसीटीव्हीमध्ये 4 आरोपी दरोडेखोर कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्रिल राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर घटनास्थळी दाखल झाले असुन तपास सुरु आहे. घटनास्थळी डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट तज्ञ यांना पाचारण्यात आले आहे. अज्ञात पाच जणांनी बँकेमध्ये प्रवेश केला होता. दरोडेखोरांनी किती मुद्देमाल चोरून नेला आहे याची माहिती मात्र कळू शकली नाही.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.