For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : सोलापूर शहर गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर कारवाई ; 2 लाख 31 हजारांचा मुद्देमाल जप्त

05:33 PM Dec 25, 2025 IST | NEETA POTDAR
solapur news   सोलापूर शहर गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर कारवाई   2 लाख 31  हजारांचा मुद्देमाल जप्त
Advertisement

                                   सोलापूरच्या बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Advertisement


सोलापूर :
सोलापूर शहर गुन्हे शाखेने सात रस्ता परिसरातील जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करत २५ जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरुन २ लाख ३१ ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने यांना या परिसरात रौफ भंडाले जुगाराचा अड्डा चालवत असल्याची गोपनीय माहिती मंगळवारी मिळाली. त्या आधारे सहायक निरीक्षक निलेश पाटील-सोनवणे, विजय पाटील यांच्या पथकास छापा टाकण्याचे आदेश देण्यात आले.त्यानुसार इंडिया टी हाऊसच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. त्या ठिकाणी ३० व्यक्ती पत्त्याच्या डावावर जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यापैकी २५ जणांना ताब्यात घेतले असून पाचजणांनी गर्दीतून पळ काढला.

Advertisement

या कारवाईदरम्यान जुगार खेळतानामिळून आलेली रोख रक्कम, पत्यांचा कॅट, डीव्हीआर, इन्व्हर्टर व लोखंडी कपाट असा एकूण दोन लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात हा जुगार अड्डा रौफ भंडाले व रियाज हुंडेकरी हे चालवत असल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने तसेच गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी केली आहे.

 

Advertisement
Tags :

.