For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | सोलापूर नागरिकांनी आपले नातेवाईक आखाती देशात असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा ; प्रशासनाचे आवाहन

04:56 PM Mar 03, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   सोलापूर नागरिकांनी आपले नातेवाईक आखाती देशात असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा   प्रशासनाचे आवाहन
Advertisement

                      इराण-इराकमधील परिस्थितीवर प्रशासनाचे सतर्क धोरण

Advertisement

सोलापूर - इराण-इराक या देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना देण्यात येत आहेत. या देशात असलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी जिल्हा आपत्ती विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इराक येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटीलयांनी केले आहे.

Advertisement

दहा सोलापूर जिल्ह्यातील नागरिक आखाती देशात असून त्यांच्याशी प्रशासनाचा संवाद सुरु आहे. अन्य नागरिकांचीही माहिती प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. आखाती देशात असलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनास आवश्यक माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी कार्यालयातील जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष ०२१७-२७३१०१२, सोलापूर पोलीस शहर नियंत्रण कक्ष : ०२१७ २७४४६०० /२७४४६२०, सोलापूर पोलिस ग्रामीण नियत्रंण कक्षः ०२१७-२७३२००० मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई ९३२१५९०५६१ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.