For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Old Man Murdered in Solapur सोलापूरच्या बसस्थानकात काईम्बतूरच्या वृद्धाचा खून

04:54 PM Jun 12, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
old man murdered in solapur सोलापूरच्या बसस्थानकात काईम्बतूरच्या वृद्धाचा खून
Extreme Close-Up on Victim's Bloody Hand. Still Dead Body Under a Cover and Next to Numbered Markers. Spilled Blood on the Floor Suggests a Violent and Shocking Crime of Passion in Urban City
Advertisement

सोलापुरातील गजबजलेल्या एसटी स्थानकामधील फलाट २३ च्या बाजूस असलेल्या नाथजल पाणी दुकानासमोर ६३ वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली.

Advertisement

कृष्णप्रसाद व्ही (वय ६३, रा. चेरननगर, कोइम्बतूर, तमिळनाडू) असेया वृद्धाचे नाव आहे. त्यांची मुलगी प्रकृती कृष्णप्रसाद (वय २९, रा. चेरननगर, वेल्लालोर रोड, पोदनूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णप्रसाद हे पथेजा ब्रदर्स (कोडोली, सातारा) या ठिकाणी १९९९ पर्यंत डाय मेकर म्हणून खाजगी नोकरी करीत होते. त्यांच्या पेन्शनच्या कामासाठी ते सातारा व कोल्हापूर येथे जात होते. पेन्शनच्या कामासाठी १० जून रोजी सातारा येथे जाण्यासाठी ते ९ जून रोजी हैदराबाद येथून सोलापूरमार्गे साताराला निघाले होते.

Advertisement

१० रोजी पहाटे तीनच्या सुमारास सोलापूर एसटी स्थानकामधील फलाट क्र. २३ च्या बाजूस असलेल्या नाथजल पाणी बॉटल दुकानासमोर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कृष्णप्रसाद यांच्या डोक्यात मारून त्यांचा खून केला. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांची मुलगी प्रकृती कृष्णप्रसाद यांनी सोलापुरात येऊन फौजदार चावडी पोलीस ठाण्यात खुनाची फिर्याद दाखल केली. सहायक निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.