For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

Solapur Breaking : मराठा आंदोलकांनी रोखला सोलापूर- पुणे महामार्ग! जिल्ह्यात मराठा आंदोलन तीव्र

04:42 PM Nov 01, 2023 IST | Abhijeet Khandekar
solapur breaking   मराठा आंदोलकांनी रोखला सोलापूर  पुणे महामार्ग  जिल्ह्यात मराठा आंदोलन तीव्र
Solapur Breaking

सोलापूर : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने आज सोलापूर पुणे महामार्गावर केंद्र सरकार राज्य सरकार चे चीता जाळून आंदोलन करून मोठ्ाप्रमाणावर टायार जाळून रस्ता रोखण्यात आला.

Advertisement

मराठा समाजाला कुंणबै प्रमाणपत्र देऊन ५० टक्के च्यां आतून ओबीसी मधून आरक्षण द्यावे. १८८१ साली मराठा समाज आणि कुणबी एक असलेले असलेले लाखो पुरावे उपलब्ध आहेत. तात्काळ राज्य व केंद्र सरकार विरोधी पक्ष एकत्र येऊन विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला सर सकट कुणबी मराठा प्रमाण पत्र देऊन मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा येणाऱ्या काळात राज्यातील सर्व पक्षाच्या राज्यकर्त्यांना घराबाहेर फिरू देणार नाही. गनिमी काव्याने मोठ आंदोलन उभा करणार असे मनोगत मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक राम जाधव यांनी व्यक्त केले.

यावेळी निशांत सावळे, नाना शिंदे, सौदागर क्षीरसागर, मऊसाब सुरवासे, वैभव कारंडे, विनायक दत्तू, सोनू जगताब, शिवलिंग शिवपुरी, अविनाश सुर्वासे, कार्तिक पाटील,राज सरडे, पवान अलुरे, श्री सुरवसे, श्रीकांत भोसले, गणेश तांदळे, शुभम लमकाने, मारुती सूरवसे, पावन शिंदे, ख्यामलिंग तांदुरे आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement

Advertisement
Tags :
×

.