For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

Solapur Breaking : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापुरात शाईफेक

02:53 PM Oct 16, 2023 IST | Abhijeet Khandekar
solapur breaking   पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापुरात शाईफेक

सोलापूर : प्रतिनिधी

जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रथमच रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. सायंकाळी साडेआठच्या दरम्यान त्यांचे शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले यावेळी त्यांच्यावर एका तरुणाने शाई फेकली.

Advertisement

प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री यांचा सत्कार होत असतानाच एका बाजूने भीम आर्मीचा कार्यकर्ता अजय मैंदर्गीकर हा त्याठिकाणी होता. त्याने भारतीय जनता पार्टीचा निषेध असो अशी जोरदार घोषणाबाजी केली. आणि पेन मधील काळी शाई पालकमंत्री यांच्यावर फेकली. तसेच काळे झेंडे दाखवून खाजगीकरण रद्द करा अशी मागणी केली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी त्याला तात्काळ बाजूला ढकलत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला रवाना केले.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.