For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | सोलापूरचा श्वास रोखणारी 'ब्लड मिस्ट्री'! रक्तपेढ्यांमध्ये अवघ्या २ दिवसांचा साठा; पुढचा रुग्ण कोणाच्या भरवशावर?

02:06 PM May 06, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   सोलापूरचा श्वास रोखणारी  ब्लड मिस्ट्री   रक्तपेढ्यांमध्ये अवघ्या २ दिवसांचा साठा  पुढचा रुग्ण कोणाच्या भरवशावर
Advertisement

                                सोलापुरात रक्तटंचाई गंभीर;

Advertisement

सोलापूर -सोलापूर शहरात सध्या रक्तटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली असून अनेक रक्तपेढ्धांमध्ये अवघे दोन ते आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे. उन्हाळ्याची तीव्रता आणि सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी झाले असून, स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

रक्त हे प्रयोगशाळेत तयार होऊ शकत नाही, ते केवळ माणूसच माणसाला देऊ शकतो. अपघातग्रस्त, प्रसूतीतील महिला, कॅन्सर आणि वें लेसेमिया रुग्णांसाठी रक्त म्हणजे जीवनरेषा आहे. त्यामुळे वाढत्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रक्तपेढ्यांकडून नागरिकांना तातडीनेरक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement

टाळाटाळ करत आहेत. परिणामी, दरवर्षी मे महिन्यात जाणवणारा उन्हाचा पारा चाळीशीपार गेल्याने दुपारच्या वेळेत शहरात संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरे आयोजित करण्यावर मर्यादा येत असून, रक्तदातेही बाहेर पडण्यासतुटवडा यंदा एप्रिलपासूनच तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन रक्तपेढ्यांकडून करण्यात येत आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत प्रत्येक थेंब रक्त एखाद्याचे प्राण वाचवू शकतो, हे लक्षात घेऊन नागरिकांनी प्रतिसाद देणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :

.