For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोलापूरमध्ये पोटदुखीच्या त्रासाला कंटाळून सैन्यदलातील जवानाची आत्महत्या; परिसरात एकच हळहळ

02:30 PM Sep 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
सोलापूरमध्ये पोटदुखीच्या त्रासाला कंटाळून सैन्यदलातील जवानाची आत्महत्या  परिसरात एकच हळहळ
Advertisement

संकेश्वर (सोलापूर): सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्य दलाच्या जवानाने पोटदुखीच्या नाहक त्रासाने झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना १५ रोजी सकाळी उघडकीस आली. अण्णासाहेब शिवाजी मोहिते (वय ३३ रा. सोलापूर ता. हुक्केरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेने सोलापूर गाव परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंविधी प्रसंगी मराठा लाईफ इन्फट्टी वतीने मानवंदना देण्यात आली.

Advertisement

अण्णासाहेब मोहिते हे ४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी सणासाठी सुट्टी घेऊन सोलापूर या आपल्या गावी आले होते. गेल्या दोन दिवसांपासून अचानक पोट दुखीचा त्रास सुरु झाला. सोमवारी सायंकाळी नाहक त्रास होत असतानाच वैद्यकीय उपचाराचे निमिताने ते बाहेर पडले होते. पण नाहक त्रासापोटी मुरारजी निवाशी शाळे नजीकच्या ठिकाणी असलेल्या निलगीरी झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मंगळवारी सकाळी मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद संकेश्वर पोलीसात झाली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सन २०१४ मध्ये भारतीय सैन्यदलाच्या सेवेत रुजू झाले होते. सध्या जम्मू काश्मीच्या सीमेवर सेवेत होते. गणेश चतुर्थी सणानिमित्त ४ रोजी सुट्टी घेऊन आपल्या गावी सोलापूर येथे आले होते. मात्र सोमवारी अचानक पोट दुखीचा नाहक त्रास सुरु झाल्याने उपचार करुनही उपयोग होत नसल्याच्या त्रासापोटी ते शेवटचे टोक गाठले. सेवेचा कालावधी आणखी ४ वर्षाचा होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. या घटनेने सोलापूर गावात शोककळा पसरली आहे.

Advertisement

Advertisement

.