For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Airport | सोलापूरची विमानसेवा बंद होणार नाही; आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली प्रवाशांना मोठी ग्वाही!

01:25 PM Jun 18, 2026 IST | NEETA POTDAR
solapur airport   सोलापूरची विमानसेवा बंद होणार नाही  आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली प्रवाशांना मोठी ग्वाही
Advertisement

सोलापूर -सोलापूर विमानतळावरील विमानसेवा बंद होणार नसून, नाईट लैंडिंग व कमी दृश्यमानतेत विमान उतरविण्यासाठी आवश्यक सुविधा उभारल्यानंतर विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली. बुधवारी १७) (दि. प्रसारमाध्यमांशी बोलताना कोठे म्हणाले की, मागील वर्षी सोलापूरविमानसेवेचाशुभारंभ होत असतानाही शहरात ढगाळ बाताबरण होते. त्यामुळेसुरक्षिततेच्या कारणास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विमान प्रवास रद्द करावा लागला होता.

Advertisement

तसेच पहिल्याच दिवशी विमानसेवा सुमारे तीन तास उशिराने सोलापूरमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे सध्याची परिस्थिती नवीन नसून, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. ते म्हणाले की, कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत विमानांचे सुरक्षित उड्डाण आणि लैंडिंग होण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सुविधा पूर्ण झाल्यानंतर विमानसेवा पूर्ववत आणि अधिक सक्षमपणे सुरू होईल. सोलापूर विमानतळ परिसरातील काही अडथळे आणि अतिक्रमणांचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, पालकमंत्री जयकुमार गोरे स्वतः या विषयात लक्ष घालत आहेत.

विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक असलेली अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोलापूरच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक विकासासाठी विमानतळ महत्वाचा टप्पा असल्याचे नमूद करत कोठे म्हणाले की, विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास शहराच्या विकासाला मोठी चालना मिळेल. त्यामुळे विमानसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासन सकारात्मक असून, नागरिकांनीही या प्रक्रियेकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.