साई दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला! कारचा अपघात चौघांचा मृत्यू
सोलापूर :
साई दर्शनासाठी शिर्डीला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून यामध्ये चौघांचा जागीच मृत्यु झाला आहे. कर्नाटकातून नगरकडे चाललेली चारचाकी सोलापूरातील करमाळा तालुक्यातील पांडे गावाजवळ पहाटेच्या वेळी कंटेनरला धडकली. या अपघातामधून 8 महिन्याची मुलगी सुदैवाने बचावली आहे.
या बाबत मिळालेली माहीती अशी की, कर्नाटकातील भाविक अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथिल साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. आज पहाटे सोलापूरातील करमाळा तालुक्यातील पांडे गावाजवळ पोहोचली असता कंटेनरशी गाडीची धडक झाली.
या अपघातामध्ये श्रीशैल चांदेगा कुंभार (वय ५५), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०), ज्योती दीपक हुनशामठ (३८ रा. कलबुर्गी) व शारदा हिरेमठ (वय ६७, रा. हुबळी) यांचा जागीच मृत्यु झाला. तर सौम्या श्रीधर कुंभार (वय २६), कावेरी विश्वनाथ कुंभार (वय २४), शशिकुमार त्रिशाला कुंभार (३६), श्रीदार श्रीशैल कुंभार (वय ३८), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (वय ८ महिने) आणि तवेरा चालक श्रीकांत रामकुमार चव्हाण (वय २६) हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता कि तवेरा गाडीचा चक्काचुर होऊन रस्त्याच्या कडेला उलटली होती.