For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्लायओव्हरसाठी चन्नम्मा चौकात माती परीक्षण

06:53 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
फ्लायओव्हरसाठी चन्नम्मा चौकात माती परीक्षण
Advertisement

शहराच्या इतर भागातही परीक्षणाचे काम सुरू

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गापासून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत उ•ाण पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी ठिकठिकाणी माती परीक्षण केले जात आहे. रविवारी राणी चन्नम्मा चौक येथे कामगारांकडून खोदाई करीत मशिनरीच्या साहाय्याने मातीचे परीक्षण करण्यात आले. त्यामुळे लवकरच उ•ाण पुलाचे काम सुरू होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Advertisement

शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फ्लायओव्हरचा पर्याय सुचविण्यात आला. मागील दीड ते दोन वर्षांपासून याबाबत सरकार दरबारी चर्चा सुरू आहे. हॉटेल संकमजवळील राष्ट्रीय महामार्गापासून ध. संभाजी महाराज चौकापर्यंत उ•ाणपूल केला जाणार आहे. हा उ•ाणपूल चार पदरी केला जाणार असून पहिल्या टप्प्यात 2.3 कि. मी. लांबीचा व 18 मीटर रुंदीचा उ•ाणपूल होणार आहे. यासाठी अंदाजे 275.53 कोटी रुपये खर्च येणार आहे.

उ•ाण पुलासाठी शहराच्या विविध भागात माती परीक्षण केले जात आहे. महिनाभरापूर्वी ध. संभाजी चौक येथे माती परीक्षण करण्यात आले. त्यानंतर कॉलेज रोड, क्लब रोड व आता राणी चन्नम्मा चौकात माती परीक्षण सुरू आहे. सध्या प्रस्तावीत असलेल्या डिझाईननुसार सर्वाधिक पोल राणी चन्नम्मा चौकात येणार असल्याने सखोलपणे माती परीक्षण पेले जात आहे.

Advertisement
Tags :

.