कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मातीचा भराव पेढेतील शेतीत घुसला

01:41 PM May 30, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

चिपळूण :

Advertisement

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात गतवर्षी पावसाळा संपता संपत्ता कोसळलेली संरक्षक भिंत आणि मातीचा भराव गेले २ दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसात वाहून पायथ्याशी वसलेल्या पेढे गावातील शेतीत घुसला आहे. पा मागातील शेतीसह सर्वत्र चिखल साठला असून पाणकरवाडीतील विहीर आणि रेल्वे ट्रॅकवरील मोरीही गाळाने भरली आहे. गुरुवारी महसूल कर्मचान्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान, पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गट समूह साधन केंद्र इमारतीवर झाडाची फांदी कोसळल्याने पडझड झाली आहे.

Advertisement

गतवर्षी पावसाला प्रारंभ झाल्यानंतर २७जूनता परशुराम घाटात संरक्षक मितीसह मातीचा मराव वाहून गेला त्यानंतर पाऊस जात्ता-जाता ऑक्टोबर महिन्यात पुन्हा घाटात ४० मीटर लांबीची भिंत कोसळली शिवाय तेथील मातीचा मरावही वाहून गेला. घाट योकादायक बनल्याने तेथील मार्गिका बंद करून पर्यायी बाहतूक दुसया मार्गिकवर वळवण्यात आली. त्यानंतर तेथील धोकादायक वाटत असलेल्या भिंती पाडून तेथे सध्या गॅबियन भिंत उभारण्यात येत आहे. मात्र घाटाच्यादृष्टीने बरवर उपाययोजना केल्या गेल्या असल्या तरी कोसळलेली मित, मातीचा भराव हा घाटातील दरीत अध्र्यावरच जाऊन बांबला भिंत कोसळल्यानंतर पुढे तितकासा मोठा पाऊस पडलेला नसल्याने मलबा हा अच्पविरच अडकून राहिला, तो उचलण्यासारखी परिस्थिती नसल्याने त्याकडे कुणाचे लक्षही नसल्याने पावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नवीन समस्या पेठेतील शेतकायांपुढे उभी राहिली आहे.

गेले २ दिवस पावसाने विश्रांती घेतली चिपळूण: पंचायत समितीच्या गट समूह साधन केंद्र इमारतीवर झाडाची फांदी पडल्याने इमारतीचे झालेले नुकसान, असली तरी यापूर्वी कोसळलेल्या आठवडाभराच्या मुसळधार पावसात सोमवारी पडलेल्या जास्तीच्या पावसाने मातीचा भराव घाटातील दरीतून वाहून थेट पायथ्याशी वसलेल्या पेढे-पाणकरवाडीतील शेतात गेला

तेथील एक विहीरही गाळाने भरली आहे. शिवाय कोकण रेल्वेच्या ट्रॅकवरील मोरी या माळाने काठोकाठ भरली आहे. हा गाळ तेथून न काढल्यास पाणी जाण्यासाठी दूसरा मार्ग नसल्याने येणाऱ्या पावसात ट्रॅकवरून पाणी ओलांडण्याची भीती स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे वाहून आलेला गाळ हा तेथील शेतीत गेल्याने १० ते १५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना महामार्गकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. दरम्यान, गुरुवारी नुकसानीची माहिती मिळाल्यानंतर महसूल कर्मचारी विजया मिटकर यांनी पटनास्थळी जाऊन पाहणी केली.

रविवारी रात्रीच्या पावतात पंचायत समिती आवारात असलेल्या शिक्षण विभागाच्या गटसमूह साधन केंद्र इमारतीवर बाजूच्या पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी पडून इमारतीची पडझड झाली. या इमारतीत तळमजल्यात विषय तज्जा विशेष शिक्षक बसतात तर वरच्या मजल्यावर रेकॉर्ड आहे. पावसात झालेल्या पडझडीमुळे पत्र फुटले, भिंत कोसळली, शिवाय इतर भिंतीनाही तडे गेले यामध्ये रेकॉर्डही मिजले आहे. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article