For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोहमला सहा दिवसांची पोलिस कोठडी; कार जप्त

02:39 PM Apr 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
सोहमला सहा दिवसांची पोलिस कोठडी  कार जप्त
Advertisement

पणजी : कुडचडे येथील वासनाकांडप्रकरणी दुसऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या  संदर्भात आरोपी सोहम सुशांत नाईक (वय 20) याला न्यायालयाने  सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सोहम नाईकविऊद्ध आतापर्यंत पाच एफआयआर दाखल झाले असून त्याची गुह्यासाठी वापरण्यात आलेली कार जप्त करण्यात आली आहे. सोहम नाईक याच्यावर तीन वर्षांहून अधिक काळ अल्पवयीन मुली आणि महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याने त्यांना लग्नाचे आमिष दाखवून अश्लील चित्रीकरण करून आणि पीडितांना ब्लॅकमेल करून हे अत्याचार केले.

Advertisement

गुन्हे शाखेने पॉक्सो कायदा, गोवा बाल कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमांचा वापर केल्यामुळे सोहम नाईकवर कायदेशीर दबाव वाढत आहे. 19 वर्षीय महिलेवर अत्त्याचार केल्याच्या आरोपाखाली काकोडा येथील 20 वर्षीय सोहम नाईकचे नाव नमूद केल्यानंतर, बाल न्यायालयाने  नाईक याला  मंगळवारी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश दिला होता. आता न्यायालयाने त्याला दुसऱ्या एका 14 वर्षीय मुलीवरील नोंदवलेल्या अत्याचार प्रकरणात केपेच्या जेएमएफसी न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

मोबाईल, कार फॉरेन्सिक तपासणीला

Advertisement

लैंगिक शोषण प्रकरणी वापरण्यात आलेली कथित कार आणि सोहमचा मोबाईल फोन गुन्हे शाखेने जप्त केला आहे. या कारमध्ये काही पुरावे सापडण्याची शक्यता असल्याने तिची बारकाईने तपासणी केली जाणार आहे. फोनमध्ये महिलांचे व्हिडीओ आणि चॅट तपासून त्यातील पुरावे गोळा केले जाणार आहेत.

Advertisement
Tags :

.