हैदराबादमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरची आत्महत्या
06:08 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ हैदराबाद
Advertisement
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका 36 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरने कथित स्वरुपात आत्महत्या केली आहे. सीताराम असे मृताचे नाव असून त्याने हुसैन सागर सरोवरात उडी घेत स्वत:चे जीवन संपविले आहे. तर यानंतर प्राप्त झालेल्या 19 पानी पत्रात त्याने स्वत:ची पत्नी रेणुकावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
वैवाहिक वाद आणि मानसिक तणावामुळे आत्महत्येचे पाऊल उचलत आहे. माझी पत्नी रेणुका मागील दीड वर्षांपासून परपुरुषांसोबत अनैतिक संबंध ठेवून असल्याचा आरोप सीतारामने पत्रात केला आहे. स्वत:चा मोडलेला विश्वास आणि भावनात्मक छळाचा उल्लेख करत सीतारामने मी नेहमीच पत्नीची काळजी घेतली, परंतु याच्या बदल्यात मला केवळ विश्वासघात मिळाल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत चौकशी सुरू केली आहे.
Advertisement
Advertisement