For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सोफिया वेरगाराने घेतला घटस्फोट

06:08 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोफिया वेरगाराने घेतला घटस्फोट

दुसऱ्या पतीपासून झाली विभक्त

Advertisement

51 वर्षीय हॉलिवूड स्टार सोफिया वेरगाराने पती जोई मॅनगनिलोपासून घटस्फोट घेतला आहे. दोघेही परस्पर सहमतीने विभक्त झाले आहेत. सोफिया आणि जोईने प्रीनपनुसार सौहार्दपूर्ण पद्धतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रीनप म्हणजेच प्रीनप्शियल अॅग्रीमेंट  असते, यात कायदेशीर करार असतो, ज्यात विवाहापूर्वी जोडपे एखाद्या कारणाने वेगळे होण्याची वेळ आल्यास संपत्तीपासून मुलांचा ताबा आणि अन्य गोष्टींचे वाटप कशाप्रकारे होईल हे नमूद असते. सेफिया आणि जोई यांच्यातील करारानुसार स्वत: कमाविलेल्या गोष्टी ते स्वत:कडे ठेवू शकणार आहेत.

माझे पती अपत्य इच्छित होते, तर मला वृद्ध आई व्हायचे नव्हते. मला 32 वर्षांचा एक मुलगा आहे, मी आता आई नव्हे तर आजी होण्यासाठी तयार असल्याचे सोफियाने म्हटले आहे. सोफिया आणि जोईने 2015 मध्ये विवाह केला होता. सोफियाने अलिकडेच स्वत:चा 51 वा जन्मदिन ईटलीत पतीशिवाय साजरा केला होता, यानंतर दोघांमधील मतभेदांची चर्चा सुरू झाली होती.

Advertisement

जोईपूर्वी सोफियाने 1991 मध्ये जो गोंजालेजसोबत विवाह केला होता, त्या विवाहापासून तिला एक मुलगा आहे. त्याचे नाव मनोलो गोंजालेज वेरगारा आहे. सोफिया ही हॉलिवूडमध्ये अद्याप सक्रीय आहे. तसेच तिचा जगभरात मोठा चाहतावर्ग देखील आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.