For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘तारक मेहता’मधील ‘सोधी’ पाच दिवसांपासून बेपत्ता

06:40 AM Apr 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘तारक मेहता’मधील ‘सोधी’ पाच दिवसांपासून बेपत्ता
Advertisement

पोलिसांना अपहरणाचा संशय; तपास सुरू

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘सोधी’ची भूमिका साकारणारे कलाकार गुरूचरण सिंग गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता आहेत. 22 एप्रिल रोजी ते दिल्लीहून मुंबईला रवाना झाले होते. त्यानंतर कुणालाही त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळू शकलेली नाही. याप्रकरणी गुरूचरण यांच्या वडिलांनी 25 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता दिल्लीतील पालम पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. सद्यस्थितीत पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यात गुरूचरण सिंग तेथून जाताना दिसत आहेत.

Advertisement

गुरचरण सिंग यांचा फोनही 24 एप्रिलपर्यंत कार्यरत होता, पण आता तो बंद  आहे. 22 एप्रिल रोजी बेपत्ता होण्यापूर्वी गुरूचरण सिंग यांचे फोनवर कोणाशी बोलणे झाले होते याचा पोलीस तपास करत आहेत. तपास यंत्रणांकडून त्यांचे कॉल रेकॉर्ड शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांना त्यांच्या फोनवरून काही आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे.

गुरूचरण सिंग यांच्या एका कौटुंबिक मित्राने संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकला. ते 22 एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला निघाले होते. मात्र मुंबईत पोहोचलेच नाहीत.  गुऊचरणचे दोन मोबाईल नंबर आहेत, त्यापैकी एक बंद होता, तर दुसरा नंबर सतत वाजत होता. मी मुंबई विमानतळावर त्यांची बराच वेळ वाट पाहिली पण रात्री 1 वाजेपर्यंत वाट पाहून आपण घरी परतल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी मी त्याच्या वडिलांना फोन करून माहिती दिली. मला वाटले की कदाचित तो फ्लाईटमध्ये चढला नसेल किंवा त्याची फ्लाईट चुकली असेल. पण त्याच्या वडिलांनी सांगितले की तो मुंबईकडे निघाला. यानंतर मी त्याच्या दुसऱ्या फोन नंबरवर 2 दिवस फोन केला पण कोणीही फोन घेतला नाही, असे निकटवर्तीयाने पुढे सांगितले. तसेच काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती, असेही स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.